Malegaon Sugarcane Payment Announcement: माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने शनिवारी (ता. २१) उसाला प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल जाहीर केली. उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार व संचालक मंडळांनी वरील धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी दिली. .बारामती स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १६) उसाला प्रतिटन ३९५० रुपयांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी आयोजित केलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे सभासदांची लक्ष लागले होते..Beed Sugarcane Price Protest: ऊस दरावरुन बीडमधील शेतकरी आक्रमक, पाडळसिंगी टोलनाक्यावर साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन.माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने ३९०० रुपये देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. याबाबत उपाध्यक्ष शेंडे माहिती दिली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळ उपस्थित होते..दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील रिकव्हरी झोनच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात माळेगाव, सोमेश्वर कारखान्याने ३९०० ते ३९५० पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला. परिणामी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळणार आहेत..Sugarcane Price: ऊसाला साडेसात हजार दर द्या; अन्यथा साखर बाहेर पडू देणार नाही : रघुनाथदादा पाटील.नक्कीच संबंधित कारखान्याचे प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. पुढील आठवड्यामध्ये माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यासाठी मी स्वतः बारामतीला येणार आहे.’’.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण म्हणाले, ‘‘माळेगाव कारखान्याने ३९०० रुपये यंदाचा दर जाहीर केला आणि खऱ्या अर्थाने येथील संचालक मंडळाने लोकनेते अजितदादा पवार यांना ऊस दराच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.’’ सभासद राहुल पाटील तावरे यांनीही सभासदांच्या वतीने माळेगाव कारखान्याच्या प्रशासनाचे अभिनंदन केले..‘माळेगाव’चे सव्वातीन लाख टन गाळपमाळेगाव साखर कारखान्याने ३८ दिवसांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात तीन लाख वीस हजारांपेक्षा अधिक ऊस गाळप केला आहे. तसेच, साखरपोती तीन लाख बत्तीस हजार इतके उत्पन्न घेतले आहे. सरासरी साखर उताराही १०.७६ टक्के इतका मिळाला आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.