Onion Rate | Onion Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : चाकणच्या बाजारात नव्या कांद्याचा हंगाम सुरू

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसाने वखारीत साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टीम ॲग्रोवन

चाकण, जि. पुणे ः येथील महात्मा फुले बाजारात (Chakan APMC) रविवारी (ता. २५) हंगामातील नव्या कांद्याची सुमारे अकराशे क्विंटल आवक (Onion Arrival) झाली. अंकुश केंदळे (रा. शिंदे, ता. खेड) यांच्या कांद्याला प्रति किलोला घाऊक बाजारात २५ रुपये भाव (Onion Rate) मिळाला, अशी माहिती कांदा व्यापारी विक्रम शिंदे यांनी दिली. तर प्रतवारीनुसार १५ ते २५ रुपये भाव होता.

नवीन बरोबरच जुन्या कांद्याची अल्प प्रमाणात आवक होत आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, व्यापारी माणिक गोरे यांनी दिली. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसाने वखारीत साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची निर्यात सध्या होत नसल्याने कांदा देशांतर्गत विक्री होत आहे.

कांद्याचे भाव मागे गडगडले होते. ते भाव अगदी आठ ते दहा रुपये प्रति किलोला होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता. कांद्याच्या भावात प्रति किलोला १५ रुपयाची वाढ झालेली आहे. ही वाढ मोठी आहे. नवीन कांदा बाजारात आला आहे. त्याचबरोबर जुनाही कांदा बाजारात येत आहे.

चाकण येथून देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी पाठविला जातो. मुंबई, कोकण भाग, दिल्ली, बंगळूर, केरळ, चेन्नई, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आदी भागात कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. परराज्यांतील व्यापारी कांदा खरेदीसाठी बाजारात येत असतात. नवीन कांद्याची आवक जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे.

निर्यात सुरू झाल्यास दरवाढीची शक्यता

केंद्र सरकार पुढील काही महिन्यांत कांद्याची निर्यात सुरू करणार असल्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी तसेच निर्यातदार कंपन्यांनी व्यक्त केली आहे. निर्यात सुरू केली तर कांद्याचे भाव वाढतील, अशी शक्यता व्यापारी, निर्यातदार प्रशांत गोरे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT