MSP  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Procurement : हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी ‘नाफेड’ची तयारी सुरू

Soybean MSP : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात उत्पादित शेतीमालाच्या आधारभूत किमतीने अर्थात हमीभावाने खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Team Agrowon

Latur News : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात उत्पादित शेतीमालाच्या आधारभूत किमतीने अर्थात हमीभावाने खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

यात सोयाबीनचीही खरेदी करण्यात येणार असून बाजारभावाच्या तुलनेत हमीभाव जास्त असल्याने यंदा सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी ‘नाफेड’च्या केंद्रावर येण्याची शक्यता आहे. यामुळेच सोयाबीनबरोबरच मका, तूर, हरभरा, मूग व उडदाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन लातूर जिल्हा पणन अधिकारी मारुती सोमारे यांनी केले आहे.

क्यूआर कोड स्कॅन करून शेतकऱ्यांनी ही नोंदणी करता येणार असल्याचेही श्री. सोमारे यांनी सांगितले. खरिपातील मका, तूर, मूग व सोयाबीन तर रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी अडीच महिन्यांपू्र्वीपासून तयारी करण्यात येत आहे. शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीनुसार जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही श्री. सोमारे यांनी सांगितले.

‘नाफेड’ कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ई-समृद्धी (eSamriddhi) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ‘नाफेड’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

यात केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत आपल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी https://esamridhi.in/#login या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या शेतीमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर पूर्वनोंदणी करावी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर जिल्हा पणन अधिकारी विलास सोमारे (८१०८१८२९५०), परभणी जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे (८१०८१८२९४६) व एमईएमएल कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीधर कानडे (९५६१७१७१७५) यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT