MSP 2025 Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP 2025 : सोयाबीनच्या हमीभावात ४३६ तर कापसात ५८९ रुपयांची वाढ; तुरीला ८ हजार रुपये हमीभाव

Kharif MSP 2025 : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ खरीप हंगामासाठी १४ पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजेच हमीभाव बुधवारी (ता.२८) जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभावाला मंजुरी देण्यात आली.

Anil Jadhao 

MSP Kharif 2025 : केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात ४३६ रुपयांची वाढ केली. तर कापसाच्या हमीभावात ५८९ रुपयांची वाढ केली. त्यामुळे खरिप हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव असेल. तर लांब धाग्याच्या कापसाला  ८ हजार ११० रुपये हमीभाव मिळणार आहे. तुरीचा हमीभावही ८ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ खरीप हंगामासाठी १४ पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजेच हमीभाव बुधवारी (ता.२८) जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये हमीभावाला मंजुरी देण्यात आली.   

केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ४३६ रुपयांची वाढ केली. सोयाबीनचा हमीभाव आता ५ हजार ३२८ रुपये झाला आहे. तर मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५८९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे खरिप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ७१० रुपये हमीभाव असणार आहे. तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ११० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला. 

तुरीच्या हमीभावातही ४५० रुपयांची वाढ करण्यात आली. तुरीचा हमीभाव यंदाच्या खरिपात ८ हजार रुपये असणार आहे. तर मक्याच्या हमीभावातही १७५ रुपयांची वाढ करण्यात आली. मक्याचा हमीभाव आता २४०० रुपये झाला आहे. ज्वारीच्या हमीभावातही ३२८ रुपयांची वाढ करण्यात आली. हायब्रीड ज्वारीला आता ३ हजार ६९९ रुपये हमीभाव असेल. तर मालदांडी ज्वारीला ३ हजार ७४९ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला. 

हमीभाव वाढीविषय़ी माहिती देताना केंद्रीय माहीती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन हमीभाव जाहीर केली आहे. हमीभाव ठरवताना कृषी किंमत व मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव जाहीर केला आहे. यामध्ये मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत मागणी, जागतिक बाजारभाव, जागतिक बाजारातील घडामोडी, तसेच पाणी, जमीन यांचा विचार करून आयोगाकडून शिफारस केली जाते." 

खरिप पिकांचे २०२५-२६ साठीचे हमीभाव
पीक…२०२४-२५…२०२५-२५… वाढ
कापूस मध्यम धागा…७१२१…७७१०…५८९
कापूस लांब धागा…७५२१…८११०…५८९
सोयाबीन…४८९२…५३२८…४३६
तूर…७५५०…८०००…४५०
मका…२२२५…२४००…१७५
ज्वारी हायब्रीड…३३७१…३६९९…३२८
ज्वारी मालदांडी…३४२१…३७४९…३२८
भात सामान्य…२३००…२३६९…६९
भात ए ग्रेड…२३२०…२३८९…६७
बाजरी…२६२५…२७७५…१५०
रागी…४२९०…४८८६…५९६
मूग…८६८२…८७६८…८६
उडीद…७४००…७८००…४००
भूईमूग…६७८३…७२६३…४८०
सूर्यफूल…७२८०…७७२१…४४१
तीळ…९२६७…९८४६…५७९
कारळे…८७१७…९५३७…८२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT