Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : मे नंतर आणखी साखर निर्यातीस परवानगी शक्य

केंद्राने यंदाचे साखर निर्यात धोरण जाहीर करण्यास हंगाम सुरू झाल्यानंतर जवळजवळ महिनाभर उशीर केला. त्यातच खुल्या पद्धतीने निर्यातीस परवानगी दिली नाही.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : केंद्राने ६० लाख टन साखर निर्यातीची (Sugar Export) दिलेली परवानगी ही अंतिम परवानगी नसून साखरेची मे नंतरची परिस्थिती पाहून निर्यातीला पुन्हा परवानगी मिळू शकते, असा निर्वाळा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने निर्यातीचे धोरण (Sugar export Policy) जाहीर केल्यानंतर दिला आहे.

केंद्राने यंदाचे साखर निर्यात धोरण जाहीर करण्यास हंगाम सुरू झाल्यानंतर जवळजवळ महिनाभर उशीर केला. त्यातच खुल्या पद्धतीने निर्यातीस परवानगी दिली नाही. असे असतानाही मे पर्यंत ६० लाख टन इतक्या मर्यादित स्वरूपात साखर निर्यातीस परवानगी दिली. साखर साठा संभाव्य विक्री आणि दर याबाबतचा तपशील मागवल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी ११२ लाख साखर निर्यात झाली होती. जून-जुलैमध्ये पावसाळी हवामानामुळे साखर निर्यातीस अडथळे येत असल्याने या दोन महिन्यात साखर निर्यात कमीच होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर निर्यातीस कमी परवानगी मिळणार, हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने मे नंतर निर्यातीस परवानगी मिळू शकते, असे सांगितले आहे.

‘...तर विक्री, मूल्याचे संतुलन कायम राहील’

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महानिर्देशक संजय मोहंती यांनीही केंद्र आणखी ३० लाख टन साखरेस परवानगी देईल, असा आशावाद नुकताच व्यक्त केला. इतक्या साखर निर्यातीत जरी परवानगी दिली तरी देशातील साखरेचे उत्पादन विक्री व मूल्याचे संतुलन कायम राहू शकते, अशी प्रतिक्रिया मोहंती यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT