Urad Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : उडदाचे भाव वाढतील का?

Urad Market Update : उडदाचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. उडदाच्या भावात तेजी आल्यानंतर नफावसुलीसाठी उडदाची विक्री वाढली होती. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी असला तरी उडदाचे भाव स्थिरावले होते.

अनिल जाधव

देशातील बाजारात कापसाच्या वायदे आणि बाजार समित्यांमधील भावात काहिसे चढ उतार सुरु आहेत. कापसाचे वायदे काल दुपारी असलेल्या पातळीदरम्यानच आजही होते. काल वायदे बंद झालेल्या पातळीवरून आज दुपारी भाव २२० रुपयांनी कमी होऊन ५८ हजार ४०० रुपयांवर आले होते.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे ८१ सेंटच्या दरम्यान आहेत. कालच्या पातळीवरून आंतरराष्ट्रीय बाजारा भाव काहिसे वाढले. बाजार समित्यांमधील भावाचा विचार करता आजही भावपातळी ढोबळ मनाने कायम होती.

कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापसाची होणारी आवक आणि कापसाला असलेला उठाव पाहता कापसाच्या भावात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनची भावपातळी आज क्विंटलमागं १०० रुपयांनी वाढली होती. सोयाबीनचा सरासरी भाव आज ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचला. सोयापेंड निर्यातीचे सौदे काही प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सोयाबीनला उठाव मिळत असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे आज स्थिर होते.

दुपारपर्यंत सोयाबीन १३.३२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयापेंड ४२८ डाॅलर प्रतिटनावर होते. देशातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक चांगली होत आहे. तर मागील हंगामातील स्टाॅकही उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. पण उत्पादनही यंदा मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे सोयाबीनच्या भावात पुढील काळात काहिशी वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

उडदाचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. उडदाच्या भावात तेजी आल्यानंतर नफावसुलीसाठी उडदाची विक्री वाढली होती. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी असला तरी उडदाचे भाव स्थिरावले होते.

त्यातच काही प्रमाणात आयातही सुरु आहे. नव्या उडदाची आवक अनेक बाजारांमध्ये सुरु झाली. यामुळेही उडदाच्या भावातील तेजी थांबली आहे. सध्या उडदाचे भाव ८ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आहेत.

यंदा देशातील उडीद उत्पादन गरजेपेक्षा कमीच राहिले. तसेच सणांच्या काळात उडदाच्या डाळिला चांगला उठाव राहू शकतो. त्यामुळे उडदाच्या दरातील तेजी कायम राहू शकते. तर रब्बीतील उत्पादनही कमीच राहण्याचा आहे. त्यामुळे तेजीला आधार असल्याचे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झालली दिसते. कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसत आहे. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीचा उठाव कायम आहे.

यामुळे दराला आधार मिळत आहे. पण तरीही हिरव्या मिरचीचे भाव मागील दोन आठवड्यांपासून काहिसे नरमलेले दिसत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी ३ हजार ४ हजारांचा भाव मिळत आहे.

यापुढील काळात पिकसाठी पुरेशे पाणी अनेक भागात उपलब्ध नसेल. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या पिकालाही फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

वांग्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहिशी नरमाई आल्याचे दिसते. वांग्याची बाजारातील आवक काहिशी सुधारल्याचे व्यापारी सांगत होते. पण बाजारातील आवकेची स्थिती पाहिली तर आवकेत फार मोठी सुधारणा दिसत नाही. तसेच वांग्याला उठावही चांगला आहे. त्यामुळे वांगल्याचे व्यवहार २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत.

वांग्याचा चालू असलेला सिझन जमिनीतील ओलावा आणि थंडीमुळे पार पडू शकतो. पण नव्या लागवडीला बहुतांशी भागात पाण्याची टंचाई भासणार आहे. यामुळे सहाजिकच बाजारातील वांगी आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. यामुळे वांगी दरातील तेजी कायम राहून, पुढील काळात वांग्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT