Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Rate : सोयाबीनचे दर सुधारतील का ?

टीम ॲग्रोवन

कापसाचे दर स्थिर

1. देशातील कापूस बाजारावर महागाईमुळं दबाव असल्याचं सांगितलं जातं. अनेक देशांमध्ये महागाई वाढल्यानं कापडाची मागणी कमी झाली. परिणामी भारताची कापड निर्यातीवर परिणाम झालाय. त्यामुळं उद्योगाकडून कापसाची खरेदी धिम्या गतीनं सुरु आहे. कापडाची मागणी वाढल्यानंतर कापसालाही उठाव मिळेल. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ते ९ हजार ५०० रुपये दर मिळतोय. नोव्हेंबरच्या शेवटी कापसाला मागणी वाढण्याची शक्यता असून सरासरी दर ९ हजार रुपये राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

झेंडू भाव खाणार

2. दिवाळीसाठी आता झेंडूच्या फुलांना मागणी वाढत आहे. तसचं काही बाजार समित्यांमध्ये झेंडूच्या फुलांचे व्यवहारही सुरु झाले आहेत. मात्र राज्यात मागील १५ दिवस जोरदार पाऊस झाला. इतर पिकांसह झेंडूच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं बाजारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. सध्या बाजारात झेंडूच्या फुलांना प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय. दिवाळीच्या काळात झेंडूचे दर तेजीत राहतील, असा अंदाज फुलबाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

ज्वारीचे दर वाढले

3. राज्याच्या बाजारात ज्वारीची आवक सध्या कमी झालेली आहे. पुणे, मुंबई, सोलापूरसह काही महत्वाच्या बाजारांमध्ये ज्वारीची आवक १०० ते ३०० क्विंटलच्या दरम्यान होतेय. मात्र इतर बाजारांतील आवक सरासरी १० ते १५ क्विंटलपेक्षा कमीच आहे. त्यामुळं दरही चांगले आहेत. राज्यात रबी हंगामात ज्वारीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. पण मागील रबीत उत्पादन कमी राहिल्यानं सध्या काहीसा तुटवडा असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या ज्वारीला २ हजार ५०० ते ४ हजार रुपये सरासरी दर मिळतोय.

टोमॅटोची आवक मर्यादीत

4. राज्यातील बाजारात टोमॅटोला सध्या चांगला दर मिळतोय. नुकत्याच झालेल्या पावसानं टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळं आवकही काहीशी कमीच होतेय. मात्र टोमॅटोची मागणी टिकून आहे. परिणामी दर स्थिर आहेत. राज्यात सध्या टोमॅटोला सरासरी किमान २ हजार ३०० ते ३ हजार ७०० रुपये दर मिळतोय. सणांच्या काळात मागणी चांगली राहण्याची शक्यता असल्यानं दरही टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

सोयाबीनचे दर सुधारतील का ?

5. देशातील बाजारांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सुरु झाली. दिवाळी आणि रब्बी पेरणीची (Rabi Sowing) नड असल्यानं शेतकरी सोयाबीन काढणी (Soybean Harvesting) केल्यानंतर लगेच बाजारात नेत आहेत. त्यामुळं सध्या होत असलेल्या आवकेत पावसानं ओलं झालेल्या सोयाबीनचं प्रमाण जास्त आहे. तर एफएक्यू (FAQ Quality Soybean) म्हणजेच १० टक्के ओलावा, २ टक्के काडी-कचरा, आणि २ टक्के तुटफूट या दर्जाच्या सोयाबीनचं प्रमाण कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं बाजारात दरही (Soybean Rate) दर्जानुसार मिळतोय.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजरात सोयाबीन तेलाचे दर वाढल्यानं सोयाबीनलाही काहीसा आधार मिळाला. देशात एफएक्यू दर्जाच्याच सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. नवं आणि ओलावा अधिक असलेलं सोयाबीन अद्यापही दबावात दिसतंय. मात्र पुढील काळात आंतराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसचं सोयाबीनचं नक्की किती नुकसान झालं. याचा आकडा पुढे आल्यानंतर सोयाबीन दरही सुधारु शकतात. सद्या नव्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयानं विकलं जातंय. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना किमान सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT