Moong Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Moong Rate : मूग आणखी भाव खाणार का?

बाजारात सध्या मुगाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. त्यातच यंदा देशातील मुगाची लागवड चार टक्क्यांनी घटली. पावसानं पिकाचं नुकसानही झालं. मात्र केंद्राच्या मते यंदा देशातील मुगाचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढेल. पण उद्योग आणि जाणकारांना केंद्र सरकारचा हा अंदाज मान्य नाही.

टीम ॲग्रोवन

कापसाला चांगला दर मिळणार

1. देशातील अनेक भागांमध्ये यंदा लागवड लांबल्यामुळं कापूस वेचणीचा हंगामही पुढे ढकलला गेलाय. यंदा देशात कापूस लागवड जवळपास साडेसात टक्क्याने वाढली. मात्र शेतकऱ्यांच्या मते पिकाचं मोठं नुकसान झालंय. सरकारनं यंदा ३४१ लाख गाठी तर उद्योगांनी ३७० लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज जाहीर केलाय. मात्र जाणकारांच्या मते उत्पादनात एवढी वाढ होणार नाही. त्यातच कापसाचा शिल्लक साठा कमी असल्यानं सध्या दर तेजीत आहेत. शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्रीचं नियोजन केल्यास किमान ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

मोसंबीचे दर दबावातच

2. बाजारात मोसंबीचे दर सध्या दबावातच आहेत. यंदा बदलत्या वातावरणामुळं मोसंबी पिकाला मोठा फटका बसला. उत्पादनात जवळपास ३० टक्क्यांपर्यंत घट आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. मात्र बाजारात मोसंबीला पाहिजे तसा उठाव मिळाला नाही. परिणामी मोसंबीला हंगामाच्या सुरुवातीपासूनच कमी दर मिळाला. मोसंबीची काढणी आता जवळपास पूर्ण होत आल्याचं अनेक शेतकरी सांगतात. मात्र तरीही दरात सुधारणा झाली नाही. सध्या मोसंबीला बाजारात ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. नवरात्रीमध्ये मोसंबीला उठाव मिळेल, असा अंदाज मोसंबी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

ज्वारीचा दर टिकून राहणार

3. देशात यंदा ज्वारीचा पेरा जवळपास ५ टक्क्यांनी घटलाय. महत्वाच्या ज्वारी उत्पादक पट्ट्यात यंदा पावसानं उशिरा हजेरी लावली. त्याचा परिणाम ज्वारीच्या पेरणीवर झालाय. देशात आतापर्यंत जवळपास १४ लाख हेक्टरवर ज्वारीचा पेरा झालाय. मागील दोन महिन्यांमध्ये पावसाचाही फटका ज्वारी पिकाला बसलाय. मात्र देशात यंदा ज्वारीचं उत्पादन वाढण्याचा अंदाज केंद्रानं व्यक्त केलाय. केंद्राच्या मते खरिपात १७ लाख टन ज्वारी उत्पादन होईल. मागील हंगामात १६ लाख टन उत्पादन हाती आलं होतं. तर सध्या ज्वारीला २ हजार ४०० रुपये ते २ हजार ९०० रुपयांच्या सरासरी दर मिळतोय. हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

शेपुचे दर तेजीतच

4. बाजारात सध्या शेपूच्या भाजीची आवक कमी झालीये. राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये सध्या ५०० ते १ हजार जुड्या शेपुची आवक होत आहे. त्यातच मेथी आणि पालकचे दरही तेजीत आहेत. त्यामुळं शेपुलाही चांगला दर मिळतोय. सध्या शेपुला घाऊक बाजारात प्रति शेकडा १ हजार ते १५०० रुपये दर मिळतोय. पालेभाज्यांची बाजारातील आवक लगेच वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळं शेपुच्या भाजीचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

मूग आणखी भाव खाणार का?

5. देशातील अनेक भागांमध्ये नव्या मुगाची आवक (Moong Arrival) सुरु झाली आहे. या मुगामध्ये सध्या ओलावा अधिक येतोय. त्यामुळं मुगाला हमीभावापेक्षा (Moong MSP) कमी दर मिळतोय. केंद्रानं यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर (Moong Rate) केलाय. मात्र बाजारात सध्या नव्या मुगाला ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान दर (Moong Market Rate) मिळतोय. दुसरीकडं यंदा देशातील मूग लागवड चार टक्क्यांनी घटली आहे.

देशात ३३ लाख ३७ हजार हेक्टरवर मुगाचा पेरा झाला. गेल्या वर्षी ३४ लाख ७१ हजार हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. यंदा मुगाची पेरणी घटली तरी खरिपातील उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्तच राहिल, असा अंदाज केंद्र सरकारनं व्यक्त केलाय. गेल्या हंगामात देशात जवळपास १५ लाख टन मूग उत्पादन झालं होतं. मात्र केंद्राच्या मते यंदा मूग उत्पादन १७ लाख ५० हजार टनांवर पोचेल. पण जाणकार आणि उद्योगाला सरकारचा हा अंदाज मान्य नाही. कारण यंदा देशात मुगाची लागवड घटली तर पावसानं पिकाचं नुकसानही झालं. त्यामुळं यंदा देशातील मूग उत्पादन गेल्या वर्षीपेक्षाही कमी राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. सध्या आवक वाढत असल्यानं मुगाचे दर हमीभावाच्या आसपास राहतील. मात्र सरकारनं हमीभावानं खरेदी सुरु केल्यास मुगाचे दर आणखी सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT