soybean rate
soybean rate  agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Rate : नुकसानीनंतरही सोयाबीन दबावातच का?

टीम ॲग्रोवन

कापूस दर सुधारणार

1. देशभरात कापूस पिकाचं नुकसान वाढलंय. मात्र तरीही कापसाचा बाजारभाव दबावात आहे. उद्योगांकडून उठाव कमी असल्यानं दर दबावात असल्याचं सांगण्यात येतं. सध्या जागतिक पातळीवर मंदीच्या सावटामुळं मागणी कमी झालेली आहे. मात्र ही परिस्थिती महिनाभरात सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्याकाळात कापसाचा भाव वाढू शकतो. सध्या कापसाला राज्यात ७ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर पंजाब आणि हरियानात ७ हजार ५०० रुपये ते १० हजार रुपये दर मिळतोय. पुढील काही दिवस कापसाचे हे दर राहू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

तुरीचे दर तेजीतच

2. देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. दिवाळीमुळं तुरीला उठाव मिळतोय. मिलर्सकडे डाळीसाठी मागणी वाढत आहे. त्यामुळं मिलर्सही बाजारात तुरीची खरेदी करत आहेत. तर दुसरीकडं डाॅलरच्या तुलनेत रुपया कुमकुवत होत असल्यानं आयात तुरीचे दर वाढत आहेत. परिणामी देशातील तुरीलाही सपोर्ट मिळतोय. सध्या तुरीला ७ हजार ते ८ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. हा दर पुढील महिनाभर टिकून राहील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

कांद्याचे दर सुधारले

3. देशातील बाजारात सध्या कांद्याला चांगला दर मिळतोय. सणामुळं देशभरातील बाजारामध्ये कांद्याला उठाव मिळतोय. तर दुसरीकडं बाजारातील आवक मात्र मागील दोन आठवड्यांपासून कमी होताना दिसतेय. तसचं खरिपातील कांदा लागवडीही यंदा घटल्या. पावसानंही कांदा रोपवाटीकांचं आणि पिकाचं नुकसान होतंय. परिणामी पुढील काळात कांद्याचा मर्यादीत पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त होतेय. सध्या कांद्याला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. कांदा दरात पुढील महिन्यापासून वाढ अपेक्षित असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

भुईमूग उत्पादनात घट

4. भूईमूग उत्पादनात गुजरात राज्य आघाडीवर आहे. मात्र यंदा गुजरातमधील भुईमूग पिकाला अति पाऊस आणि काही भागात कमी पावसाचा फटका बसला. मागीलवर्षी गुजरातमध्ये विक्रमी ३८ लाख ५५ हजार टन भुईमूग उत्पादन झालं होतं. यंदा त्यात तब्बल २२ टक्क्यांची घट होण्याची शक्यता असून उत्पादन ३० लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे, असं साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलंय. सध्या भुईमुगाला ५ हजार ९०० ते ६ हजार ३०० रुपये दर मिळतोय. मात्र गुजरातमधील उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

नुकसानीनंतरही सोयाबीन दबावातच का?

5. राज्यासह देशात सोयाबीन नुकसानीची (Soybean Crop Damage) पातळी वाढतेय. सोयाबीन नुकसान वाढल्याचं प्रत्यक्ष परिस्थितीवरून लक्षात येतंय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये पीक हातचं जातय. सध्या होणाऱ्या नुकसानीचं सर्वेक्षण (Crop Damage Survey) सरकार आणि उद्योगांच्या पातळीवर सुरु आहे. मात्र शेतकरी आणि जाणकारांच्या मते नुकसान १० ते २० टक्क्यांपर्यंत असू शकतं. त्यामुळं एकूण उत्पादन (Soybean Production) कमी होऊन ११० ते १०० लाख टनांवरच स्थिरावू शकतं, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करत आहेत. पावसानं सोयाबीनचं नकुसान होतंय, उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज येतोय. मात्र तरीही सोयाबीनचे दर जास्त सुधारले नाहीत.

सोयाबीनचे दर अद्यापही दबावातच आहेत. त्याला काही कारणं आहेत. एकतर पावसानं नेमकं किती नुकसान झालं, त्याचं सर्वेक्षण झालेलं नाही. दुसरं म्हणजे सध्याच्या मालात ओलावा अधिक आहे. तिसरं म्हणजे मागील हंगामातील शिल्लक सोयाबीन जास्त असल्यानं गुणवत्तेच्या मालाची गरज भागतेय. त्यामुळं सोयाबीनचे दर काहीसे दबावात दिसतात. सध्या देशात जुन्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय. तर जुनं सोयाबीन ४ हजार ९०० ते ५ हजार २०० रुपये दर मिळतोय. नुकसानीची माहिती पुढे आल्यानंतर सोयाबीनचे दर सुधारु शकतात, अशी माहिती जाणकारांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT