Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीचा बाजार काहीसा नरमला; कापूस, सोयाबीन, टोमॅटो, तसेच काय आहेत हळद दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, तूर आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आज सव्वा टक्क्याने नरमले. सोयाबीनचा बाजार पुन्हा एकदा गेल्या ४ वर्षातील नव्या निचांकावर पोचला. सोयाबीनचे वायदे निचांकी १०.०१ डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंड ३२२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू दबावातच

कापूस भाव आजही दबावातच होते. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजार सध्या शेतकऱ्यांची निराशा करत आहे. कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वाच निचांकी पातळीवर कायम आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६७.०७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ५६० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोचा बाजार नरमला

टोमॅटोच्या भावावरील दबाव आजही कायम होता. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावावर दबाव आला. राज्यातील सर्वच भागात टोमॅटोची आवक वाढत आहे. त्यामुळे टोमॅटोला सरासरी १७०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान भव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील एक-दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे, असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. 

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.    

हळदीचा बाजार नरमला

हळदीचा बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे. हळदीच्या भावावर वाढत्या लागवडीचा परिणाम होत आहे. त्यामुळे हळदीचा भाव उच्चांकापासून कमी होऊन स्थिरावलेला दिसतो. सध्या हळदीला सरासरी १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीच्या भावातील नरमाई आणखी काही आठवडे राहू शकते. हळदीच्या भावात काहीसे चढ उतारही राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT