Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Market : तुरीचे दर दबावात ठेण्यासाठी सरकारचा आटापीटा

सध्या म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांमध्ये मिळून ८ लाख टनांच्या दरम्यान तूर शिल्लक आहे. त्यामुळे यंदा तुरीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

सोयाबीन दरात नरमाई
1. देशातील बाजारात सोयाबीन दरात (Soybean Rate) नरमाई कायम आहे. काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत कमी झाले. देशातील सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दर (Soya meal Rate) वाढ झाली. देशातील बाजारावर सध्या खाद्यतेलाच्या (Edible Oil) वाढत्या साठ्याचा परिणाम दिसत असल्याचं जाणकारांनी सांगितलं. हा दबाव पुढील काही दिवस राहू शकतो. त्यानंतर दरात सुधारणा होण्याची शक्यता, असल्याचंही जाणकारांनी सांगितलं. 

कापसाचे दर स्थिर
2. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या दरात वाढ पाहायला मिळाली. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८७.४६ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मोठे चढ उतार सुरु आहेत.

तसंच देशातील बाजारातही कापसाचे दर ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या कापसाची आवक वाढलेली असल्यानं कापूस दरावर दबाव आहे. पण पुढील काळात कापसाचे दर वाढतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

घेवड्याची आवक मर्यादीत
3. राज्यातील बाजारात सध्या घेवड्याची आवक मर्यादीत झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर बाजार वगळता इतर बाजारांमधील आवक १० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळे घेवड्याचे दर सध्या तेजीत आहेत.

बाजारात सध्या घेवड्याला प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. पुढील काळात घेवड्याची बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज असून दर दबावात येतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

डाळिंबाचे भाव तेजीत

4. बाजारात सध्या डाळिंबाला चांगला दर मिळतोय. तर डाळिंबाचे दर सध्या तेजीत आहेत. सध्या बाजारात डाळिंबाची उपलब्धता कमी असल्यानं दर तेजीत आहेत.

नागपूर, मुंबई, नागपूर, सांगली आणि पुणे या बाजार समित्यांमध्ये आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळं डाळिंबाला सरासरी ८ हजार ते १० हजार रुपये क्विंटलचा दर मिळतोय. बाजारातील आवक वाढेपर्यंत हे दर टिकतील, असा अंदाज फळबाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

यंदा खरचं १० लाख टन तूर आयात होईल का?

5. देशात यंदा तुरीचे उत्पादन घटणार आहे. उद्योग आणि व्यापारी संस्थांनी यंदा ३० लाख टनांवरच उत्पादन स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला. सरकारचा अंदाज ३९ लाख टनांचा असला तरी पुढील काळात त्यात आणखी कपात केली जाईल.

सरकारच्या अंदाज आणखी ४ ते ५ लाख टनांची कपात शक्य असल्याचं अभ्यासक सांगत आहेत. तर मागील हंगामातील शिल्लक साठाही कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उद्योगाने मागील हंगामातील ७ लाख टन तूर शिल्लक असल्याचं सांगितलं. मात्र काही जणांच्या मते यापेक्षा कमी तूर उपलब्ध असेल.

त्यामुळं यंदा देशात मागणीपेक्षा पुरवठा खूपच कमी राहील. पुरवठा कमी राहील्यास दरात मोठी तेजी येईल. त्यामुळं सरकारनं यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. सरकारने १० लाख टन तूर आयात केल्यास देशात ४५ लाख टनांच्या दरम्यान पुरवठा होऊ शकतो. पण सरकारचे १० लाख टन आयातीचे उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

कारण सध्या म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांमध्ये मिळून ८ लाख टनांच्या दरम्यान तूर शिल्लक आहे. त्यामुळे यंदा तुरीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर यंदाच्या हंगामात ७ हजारत ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर राहतील, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनाी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT