Tur Rate  Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Rate: देशात तूर आवक मोठ्या प्रमाणात घटली

देशात यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर आयात वाढूनही सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच आहे. तसेच गुणवत्तापूर्ण मालाला जास्त उठाव असल्याने दरही चांगले आहेत.

Anil Jadhao 

देशात यंदा तूर उत्पादन (Tur Production) कमी राहण्याचा अंदाज आहे. तर आयात वाढूनही सध्या बाजारातील आवक (Tur Arrival) सरासरीपेक्षा खूपच आहे. तसेच गुणवत्तापूर्ण मालाला जास्त उठाव असल्याने दरही चांगले आहेत. मग सध्या तुरीला काय दर (Tur Rate) आहे? यंदा उत्पादन कसं राहील? बाजारातील आवक कशी आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. सोयाबीनचे दर स्थिर

सोयाबीनच्या दरात काल क्विंटमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली होती. मात्र आज सोयाबीनचे दर स्थिर राहीले. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर बाजारातील आवक कालच्या तुलनेत आज काहीशी कमी होती. सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दराबरोबर सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

2. कापूस दर टिकून

कापसाचे भाव मागील काही दिवसांपासून सुधारत आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर सुधारले आहेत. त्यामुळं देशातील कापूस बाजाराला आधार मिळतोय. सध्या देशात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ९०० रुपये दर मिळतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्यास देशातील दरही वाढतील. कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

3. टोमॅटो अद्यापही दबावात


राज्यातील बाजारात टोमॅटो दरातील घट कायम आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपये दर मिळतोय. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. या दरातून टोमॅटो वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

सध्या बाजारातील टोमॅटो आवक जास्त असल्यानं दर पडले आहेत. पुढील काही दिवस ही स्थिती राहू शकते, बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर दर सुधारु शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

4. शेवग्याचे दर तेजीत

सध्या बाजारातील शेवगा आवक कमी असल्यानं चांगला दर मिळतोय. सध्या पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर या बाजारात आवक थोडी जास्त दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. इतर बाजारातील आवक २० क्विंटलपेक्षा कमीच आहे. त्यामुळं शेवग्याला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

5. देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमीच आहे. तुरीची आयात सध्या जास्त असली तरी त्याचा निपटारा लगेच होतोय. त्यामुळं शिल्लक साठा उरत नाही. तसंच मागील हंगामातील तुरीचा स्टाॅक नफावसुलीसाठी हळूहळू बाजारात येतोय.

एरवी तूर बाजारात दाखल होण्यापूर्वी आधीच्या हंगामातील तूर बाजारात येते. मात्र यंदा त्याचं प्रमाण कमी राहीलं. डिसेंबर महिन्याचा विचार करता गेल्यावर्षी याच महिन्यातील आवकेच्या तुलनेत यंदा ४६ टक्क्यांची घट झाली. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ७७ हजार टन आवक झाली होती.

तर यंदा केवळ ४२ हजार टनांवर आयात स्थिरावली. परिणामी बाजारात तुटवडा असून दर वाढलेले आहेत. महाराष्ट्रातील आवक तब्बल ६२ टक्क्यांनी कमी राहीली. तर यंदा कर्नाटकात तूर उत्पादन कमी असण्याचा अंदाज आहे.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कर्नाटकातील तूर आवक कमी होण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातही तूर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकूणच देशातील तूर उत्पादन यंदा कमी राहील. त्यामुळं सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT