Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात घसरण; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत मका दर ?

Daily Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या बाजारात चढ उतार सुरु आहेत. सकाळी भावात सुधारणा झाल्यानंतर दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव ९.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आला होता. तर सोयापेंड ३१८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात मात्र मंदी कायम आहे.

प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात असल्याचा परिणाम देशातील बाजारावर दिसत आहे. कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

तर बाजारातील कापसाची आवक मागील ४ दिवसांपासून २ लाख गाठींपेक्षा कमी दिसत आहे. कालही बाजारात १ लाख ९० हजार गाठी कापूस बाजारात आला होता. बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासाकंनी व्यक्त केला.

तुरीचा बाजार दबावात

देशात यंदा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा माल बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली. जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव ५ हजाराने कमी आहे. तर नोव्हेंबरमधील भावाचा विचार केला तर सध्या २ हजार ५०० रुपये कमी भाव आहे.

सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे. पण नव्या मालाची आवक खूपच कमी आहे. पुढील महीनाभरात तूर आकेचा दबाव वाढायला सुरुवात होईल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याला आधार

मक्याला यंदाही इथेनाॅलसाठी चांगली मागणी आहे. त्यामुळे मका बाजाराला आधारही मिळत आहे. मागील काही दिवसांपासून मका आता हमीभावाच्या पुढे सरकत आहे. मक्याचा सरासरी भाव अनेक बाजारात आता २ हजार १०० ते २ हजार २५० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. बाजारातील मक्याची आवकही कमी होत आहे.

तर दुसरीकडे रब्बीतील मका लागवडही अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. यामुळे देखील मका बाजाराला भविष्यात आधार मिळणार आहे. त्यामुळे मक्याचा भाव पुढील काळात सुधारू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटो दबावात

बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढत आहे. वाढत्या आवकेचा टोमॅटोच्या भावावर काही प्रमाणावर दबाव येत आहे. टोमॅटोच्या भावातील घसरण सुरुच आहे. बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोचा भाव मागील तीन आठवड्यांमध्ये जवळपास १ हजाराने कमी झाला. अनेक बाजारात सरासरी भाव आता १ हजाराच्या खाली आला.

आज बाजारात टोमॅटोला सरासरी ७०० ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baramati Agriculture Development : दुबईतील परिषदेत बारामतीतील उपक्रमाची दखल

Ind-US Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांचे करयुद्ध आणि भारत

Heavy Rainfall: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नांदेडमध्ये पूरस्थिती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत संततधार

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

Healthy Tiffin: व्यस्त दिनचर्येतही आरोग्यदायी टिफिनचा सोपा पर्याय

SCROLL FOR NEXT