Gram Agrowon -
मार्केट बुलेटीन

Chana BajarBhav : हरभरा उत्पादकांसाठी ही आहे खुशखबर

गेल्या वर्षीपेक्षा साखर कारखाने बंद होण्याची गती यंदा खूपच कमी आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च अखेर २८४ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते.

Anil Jadhao 

1. उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. तर अकोला येथे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला. तळ कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. राज्यात उन्हाच्या (Summer) झळा चांगल्याच वाढल्या आहेत. यातच उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही असह्य होत आहे.

2. देशाने साखर उत्पादनात त्रिशतकी मजल मारली. मार्चअखेर देशात ३०९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. अपेक्षेप्रमाणे देशात महाराष्ट्राने ११८ लाख टन साखरनिर्मिती करत अव्वल क्रमांक कायम राखला. महाराष्ट्राने प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशपेक्षा तब्बल ३१ लाख टन जादा साखरनिर्मिती (Sugar) केली. देशातील १५२ कारखान्यांनी गाळप थांबवले. तर ३६६ कारखाने अद्याप ऊसगाळप करत आहेत. गेल्या वर्षीपेक्षा साखर कारखाने बंद होण्याची गती यंदा खूपच कमी आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च अखेर २८४ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. बिहार व राजस्थान मध्ये यंदाचा ऊसहंगाम पूर्णपणे संपला आहे. कर्नाटकात ७५ टक्‍क्‍यांहून अधिक हंगाम संपला आहे.

3. यंदाच्या ऊसगाळप हंगामातील उसाची एफआरपी (FRP) निश्‍चित करण्याच्या धोरणात राज्य सरकारने बदल केला. त्यानुसार महसुली विभागनिहाय अंदाजे साखर उतारा निश्चित करून एफआरपी निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला. २०२१-२२ व त्यापुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्‍चित होईपर्यंत हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा किमान एफआरपी देण्यासाठी पुणे आणि नाशिक विभागासाठी १० टक्के, तर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागांसाठी ९.५० टक्के उतारा निश्‍चित केला आहे. सरकारच्या या आदेशाविरोधात राज्यातील शेतकरी संघटनांनी विरोध केला होता. तर ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार शेट्टी यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. काही खासगी कारखानदारांचा फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

4. २०२२ साली जागतिक बाजारात (World Market) मक्याचे (Maize) दर अंदाजापेक्षाही वाढलेत अन २०२३ सालातही मक्याचे दर उतरण्याची शक्यता नाही, असं सूत्रांनी स्पष्ट केलंय. पशुखाद्य म्हणून मक्याला मागणी असते. तसेच मक्यापासून खतांची निर्मिती करण्यात येते. या दोन्ही क्षेत्रांतून मक्याला मागणी आहे. तिसरं कारण म्हणजे इंधनाचे दर गगनाला भिडलेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जात हेही आपल्याला ठाऊक आहे. आपल्याकडं साखर उद्योग क्षेत्राकडून इथेनॉल तयार होतय. मात्र जगात मक्यापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल विकसीत केलं जात. त्यामुळे इथेनॉल निर्मिती क्षेत्राकडूनही मक्याला मोठी मागणी आहे. या सर्व घटकांमुळे मक्याचे दर तेजीत राहण्याची शक्यताये.

5. हंगामाच्या सुरुवातीला देशात विक्रमी हरभार (Gram) उत्पादन होईल, असा अंदाज होता. सरकारने यंदा १३१ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र जाणकारांच्या मते चालू हंगामात ८५ ते ९० लाख टन उत्पादन होईल. त्यातच कोरोनाकाळात नाफेडने हरभऱ्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली. त्यामुळे नाफेडचीही खरेदी सुरुये. परिणामी सध्या बाजारात हरभरा आवक वाढली असली तरी देशातील मागणी आणि पुरवठ्याची स्थिती पाहता दर सुधारण्याची शक्यताये. जाणकारांच्या मते पुढील १५ दिवसांनंतर हरभरा दरात सुधारणा दिसू शकते. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहिर केला. नाफेड या भावाने खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडला जास्तीत जास्त हरभरा (Gram) विकतील. परिणामी खुल्या बाजारात हरभरा दर सुधारू शकतात, असे जाणकारांनी सांगितले. सध्या देशातील महत्वाच्या बाजारांत हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय. त्यात महाराष्ट्रात ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये आणि राजस्थानमध्ये ४ हजार ६०० ते ५ हजाराने व्यवहार होत आहेत. मध्य प्रदेशात यंदा उत्पादन वाढीची शक्यताये. मात्र शेतकरी सध्याच्या दरात हरभरा विक्री करताना दिसत नाहीत. आयग्रेन इंडियाचे संचालक राहूल चौहान यांनी सांगितले की बाजारभाव हमीभावापेक्षा २०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असतील तर शेतकरी नाफेडलाच माल विकतील. नाफेडने (NAFED) आतापर्यंत ३ लाख ७१ हजार टन हरभरा खरेदी केला. नाफेडच्या खरेदीमुळे बाजारातील घसरण थांबली. पुढील काही दिवस खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी राहू शकतात. मात्र त्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असेही राहूल चौहान यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT