Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनमधील वाढ कायम

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमधील वाढ कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आजही सुधारणा दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडचे भावही वाढले होते. सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत काहिशी वाढ झाली होती. आज दुपारपर्यंत वायदे १०.३९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला

कापसाच्या भावातही चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७४ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे आज कमी होऊन ५८ हजार २०० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारला चांगला उठाव

बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे. मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटक गवार पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाच्या भावाला आधार

गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे. सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत. पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो. त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे. यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत. गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून १०० ते १५० रुपयांनी वाढला आहे. सध्या गव्हाचा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

केळीला उठाव कायम

बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे. केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती. सध्या गणेशोत्सवामुळे भावही चांगले आहेत. तर यापुढे नवरात्रीमुळेही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी केळीला सध्या १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bajarbhav : सोयाबीनला ६ हजार भाव देणं सरकारला शक्य; सरकारने १३ हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला ६ हजार भाव मिळेल

Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

Soybean Crop Damage : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली

Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

SCROLL FOR NEXT