Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या भावात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच लसूण दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन आणखी नरमले

युएसडीएच्या अहवालानंतर सोयाबीनच्या बाजारातील मंदी वाढली आहे. सोयाबीनचा भाव आणखी निचांकी पातळीवर पोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी ९.४९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३०० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन बाजारात मंदी आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू दबावातच

जागतिक पातळीवर उत्पादन वाढ आणि मागणी कमी राहण्याचा अंदाज असल्याने कापूस बाजारात मंदी आहे. कापसाचा भाव गेले दोन महीने ७० सेंटच्या खालीच दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनिश्चित परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५७ हजार १२० रुपये प्रतिखंडीवर आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीचे भाव दबावातच

ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.     

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

लसणाचे भाव नरमले

राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT