Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: ज्वारीच्या भावात नरमाई; कोबी, गाजर, ज्वारी तसेच काय आहेत आजचे कापूस भाव

Daily Commodity Market: आज आपण कोबी, ज्वारी, चिंच, गाजर आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

कोबीचे दर दबावात

बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादीत दिसत आहे. याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे. कोबीचे दर मागील काही आठवड्यापासून दबावातच दिसत आहेत. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

गाजर टिकून

गाजराला बाजारात चांगला उठाव आहे. तसेच गाजराची आवकही चांगली सुरु आहे. त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसत आहेत. राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरु आहे. त्यामुळे सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो, असा असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

चिंचेला मागणी

चिंचेला बाजारात सध्या मागणी दिसून येत आहे. तर बाजारातील चिंचेची आवक मात्र मर्यादीत दिसत आहे. चिंच उत्पादनाला यंदा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र सध्या आवकचांगली दिसत आहे. त्यामुळे चिंचेला सध्या ९ हजार ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर बाजारातील आवक कमी होत जाईल. त्यानंतर दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारी दबावात

ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटलमागे किमान ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारातील ज्वारीची आवक वाढत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे. तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळत आहे. सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २३०० ते ३१०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दर टिकून कापसाचे भाव मागील दीड महिन्यापासून एकाच भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. कापसाची बाजारातील आवक खूपच कमी झाली. मात्र सीसीआयची विक्री सुरुच आहे. याचा दबाव कापूस दरावर येत आहे. तसेच कापूस आयात शुल्क रद्द करण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे सध्या कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मे महिन्यात बाजारातील आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. पण वाढती आयात आणि सीसीआयची कापूस विक्री याचा दरावर दबाव राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fodder Cultivation Plan: पुणे जिल्ह्यात १० हजार १०० हेक्टरवर चारा लागवड; सध्याचा साठा फक्त तीन महिन्यांसाठी

Soybean Crop Damage: पाण्याअभावी सोयाबीन पीक करपले; खेड तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

Farmer Financial Assistance: चार नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत मिळणार

Mission Mausam: ‘मिशन मौसम’अंतर्गत हवामान निरीक्षणासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि कृषी विद्यापीठात करार

Agriculture Service Improvement: कृषी उद्योजकांच्या सेवा कार्यपद्धतीत सुधारणा; परवाने, तपासणी अहवालांचे वितरण जलद होणार

SCROLL FOR NEXT