Soybean
Soybean Agrowon
मार्केट बुलेटीन

सोपाचा सोयाबीन अंदाज दिशाभूल करणारा?

Anil Jadhao 

शेपुला मिळतोय चांगला दर

गणेशोत्सवात शेपुच्या भाजीला (Shepu vegetable) चांगला उठाव असतो. तसचं गौरी पूजनासाठी (Gauri Pujan) शेपू भाजीला विशेष महत्व असते. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत शेपूला मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या शेपुच्या भाजीची आवकही वाढलेली आहे. तर दरही चांगला मिळतोय. सध्या शेपुला प्रतिशेकडा जुडी ८०० ते १००० रुपये दर मिळतोय. तर क्विंटलमध्ये २ हजार ते २ हजार ७०० रुपयाने व्यवहार होत आहेत. पुढील काळातही शेपुची आवक जास्त वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळं हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कापसाचा भाव टिकून राहणार

देशातील बाजारांमध्ये आता नव्या हंगामातील कापूस (Cotton) दाखल होतोय. नव्या कापसाची आवक (New Cotton Arrival) सध्या नगण्य आहे. मात्र पुढील काळात आवक वाढेल. तर बाजारातही सध्या कापसाचे दर तेजीत आहेत. सध्या कापसाला ८ हजार ५०० ते १० हजार रुपये दर मिळतोय. मात्र राज्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा (Pink Bowl Army worm) प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढतेय. मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळं पिकाचं नुकसान (crop damage) होण्याची शक्यता आहे. तर जाणकारांनी कापसाचा दर टिकून राहील, असा अंदाज व्यक्त केलाय.

हरभरा दर दबावात राहण्याचा अंदाज

सध्या हरभरा बाजार (Chana Market) दबावात आहे. मागील आठवड्यात हरभरा दर काहीसे नरमले होते. सणांसाठी सप्टेंबरपासून हरभरा डाळ (Chana Dal) आणि बेसनला मागणी वाढते. मात्र यंदा उद्योगाच्या अपेक्षेपेक्षा मागणी कमी आहे. त्यातच नाफेड स्टाॅकमधील हरभरा बाजारात विकत आहे. राज्यांनाही सवलतीत हरभरा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळं बाजार सध्या दबावात (Rate Under Pressure) आहे. सध्या हरभऱ्याला ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय. चालू आठवड्यातही हरभरा दर दबावात राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

मुगाच्या दरावर आवकेचा दबाव

सध्या नव्या मुगाचा दर (Moong Rate) हमीभावापेक्षा कमीच आहे. यंदा केंद्र सरकारने मुगाला ७ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव (Moong MSP) जाहिर केला. मात्र बाजारात मुगाला सध्या ६ हजार ६०० ते ७ हजार ७०० रुपये दर मिळतोय. मागील आठवड्यात मुगाला उठाव मिळाला. त्यामुळं दर काहीसे सुधारले होते. तर चालू आठवड्यातही मुगाला उठाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुगाचा दर टिकून राहील. मात्र बाजारात आवक वाढल्यानंतर मुगाच्या दरावर काहीसा दबाव वाढेल, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला.

सोपाचा सोयाबीन अंदाज दिशाभूल करणारा?

देशात सध्या सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) गेल्यावर्षीपेक्षा काहीशी घटली. तसंच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानं पिकाचं नुकसान केल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं. तर अनेक भागांत कीड-रोगांचाही परिणाम सोयाबीन पिकावर (Soybean Crop) झाला. मात्र देशातील सोयाबीन पीक हे सामान्य ते चांगल्या स्थितीत आहे, असा दावा सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं (SOPA) केलाय. देशातील सोयाबीन पिकाची वाढ अतिशय चांगली झालेली असून बहुतेक पीक हे फुले आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे, असंही सोपानं म्हटलंय. बहुतांश सोयाबीन पीक तणमुक्त आणि कीड-रोगापासून मुक्त आहे, असाही दावा सोपानं केलाय. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसला. काही ठिकाणी सोयाबीन शेतांमध्ये पाणी साचले. परिणामी सोयाबीनची पाने पिवळी पडली त्यामुळं या भागांमधील उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही राज्यात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसला नाही, असंही सोपानं म्हटलंय. सोपा सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असल्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्ष शेतकरी सांगत असलेली स्थिती वेगळी दिसते. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन मुख्य पीक आहे. या दोन्ही विभागांमध्ये सोयाबीनला पाऊस आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे सोपाच्या पीक परिस्थितीच्या दाव्यावरून शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. तर बाजारात सोमवारी सोयाबीन दरात ३०० रुपयांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. सोयाबीनला ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपये दर मिळतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT