Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हरभरा आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरुच आहेत. पण देशात मात्र सोयाबीनचा भाव स्थिरावलेला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे वाढले होते. सोयाबीनचे वायदे ९.९२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. चांगल्या उत्पादनाचे अंदाज, कमी झालेली मागणी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घट याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. यामुळे कापसाचा सुधालेला भाव पुन्हा कमी झाला. देशातील बाजारात आजही कापसाचे भाव काहीसे कमी झाले. कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे ७१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्यात काहिशी सुधारणा

कांद्याच्या भावातील चढ उतार कायम आहेत. वाढेल्या भावात कांद्याला उठाव कमी होत आहे. मात्र भाव जास्त कमी झाल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे. पण दुसरीकडे सरकारचा दबावही कांदा बाजारावर कायम आहे. त्यामुळे परिस्थिती असतानाही कांदा दरात मोठी तेजी आली नाही. आज कांद्याचा भाव महत्वाच्या बाजारांमध्ये काहिसा वाढून सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कांदा भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा भाव नरमले

हरभऱ्याच्या भावातही काहिशी नरमाई आली आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला होता. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. पण सरकारच्या दबावामुळे आणि स्वस्त वाटाण्यामुळे हरभरा भावावर काहिसा दबाव आला आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दुसरीकडे हरभऱ्याला सणांमुळे मागणी आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT