Agrowon Podcast  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आफ्रिकेतील तूर उत्पादक देशांना पावसाचा फटका

मोझांबिक आणि मालावीत फेब्रुवारीच्या शेवटी फ्रेंडी वादळानं दणका दिला. तर सर्वच तूर उत्पादक देशांमध्ये ३१ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमधली नरमाई कायम (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातील नरमाई कायम आहे. सोयाबीनचे वायदे जवळपास एक डाॅलरने कमी होऊन १४.२१ डाॅलरवर पोचले. तर सोयापेंडचे वायद्यांमध्ये ६० डाॅलरची घट झाली. सोयापेंडची वायदे ४३८ डाॅलररर्यंत कमी झाले.

देशातील बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० वर स्थिर आहेत. मात्र ही परिस्थिती जास्त दिवस टिकून राहणार नाही. सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसेल, असा अंदाज अभ्यासक आणि निर्यातदारांनी व्यक्त केलाय.

२) कापसाचे दर स्थिरावले (Cotton Rate)

देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायम आहे. सध्या बाजारात कापसाची वाढती आवक दिसून येत आहे. त्यामुळं दरावर दबाव आहे. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपये क्विंटल भाव मिळतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापसातील नरमाई थांबलेली दिसतेय. कापसाचे वायदे ७७.७८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

३) द्राक्षाला कमी उठाव

राज्यातील महत्वाच्या द्राक्ष उत्पादक भागांमध्ये मागील आठवड्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळं द्राक्ष बागांना जोरदार फटका बसला. द्राक्षाची गुणवत्ता कमी झाली. सध्या निर्यातक्षम द्राक्षाला ६० ते ७० रुपये दर मिळतोय.

तर स्थानिक बाजारातील दर ३० ते ४० रुपयांच्या दरम्यान आहेत, असे द्राक्ष व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात द्राक्षाला मोठा उठाव नाही. चांगल्या गुणवत्तेच्या द्राक्ष दराला पुढील काळात आधार मिळेल, असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) आले दरात सुधारणा

बाजारातील आवक कमी झाल्यानंतर आल्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सध्या आल्याला चांगला उठावही मिळतोय. तर दुसरीकडे राज्यातील महत्वाच्या बाजारातील आल्याची आवक घटली. त्यामुळं आल्याचे सरासरी दर ५ हजार ते ७ हजार रुपयांवर पोचले.

दरात मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागं एक ते दीड हजारांची सुधारणा झाली. आल्याचे दर पुढील काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज आहे.

५) आफ्रिकेत तूर लागवड आणि पिकाची स्थिती काय आहे?

देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. देशातील उत्पादन घटल्यानं बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं तुरीची आयात करून पुरवठा वाढवण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. वर्षभरात १० लाख टन तूर आयात केली जाईल, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सचिवांनी नुकतंच सांगितलं.

भारतात प्रामुख्यानं आफ्रिकेतील मालावी, मोझांबिक, टंझानिया केनिया आणि म्यानमारमधून तूर आयात केली जाते. या देशांतील तूर आयात बाजारात येऊन गेली. आफ्रिकेतील देशांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुरीची लागवड होते.

तर ऑगस्टमध्ये तूर काढणीला सुरुवात होते. म्हणजेच सध्या तिकडे तूर लागवडीचा हंगाम आहे. पण मोझांबिक आणि मालावीत फेब्रुवारीच्या शेवटी फ्रेंडी वादळानं दणका दिला. तर सर्वच तूर उत्पादक देशांमध्ये ३१ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे.

त्यामुळं तूर लागवडीवर तर परिणाम दिसतोच, शिवाय पिकाचं नुकसानही होत असल्याचे वृत्त आहे. परिणामी यंदा आफ्रिकेतील उत्पादनात घट येऊ शकते, असा अंदाज पेरणीच्या काळातच पुढे येत आहे. याचा फायदा भारतातील तूर उत्पादकांना होऊ शकतो.

सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. काही बाजारातील कमाल भाव यापेक्षा अधिक आहेत. पुढील काळात तुरीचे दर टिकून राहतील, असा व्यापारी आणि प्रक्रियादारांचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

Moneylenders Loans Issues: शेतकऱ्यांभोवती आवळतोय सावकारी पाश

Sugar Factory Agreement: क्रांती कारखान्याच्या गळीत हंगामासाठी तोडणी-वाहतूक करार

MAVIM Tejaswini Project: सोलापुरात नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्‌घाटन

Sugarcane FRP Issue: ‘एफआरपी’ चे ६५० कोटी अडकल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT