Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा भावावरील दबाव कायम; कापूस, सोयाबीन, तूर तसेच कांदा यांचे बाजारभाव काय आहेत ?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, तूर आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत.  सोयाबीनचे वायदे १२ डाॅलरपेक्षा जास्त दिसून येत आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १२.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंड ३७२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनचा भाव आजही ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन भावावरील हा दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस बाजारातील चढ उतारही कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांवरील दबाव कायम आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ७६.८२ सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५६ हजार २०० रुपये प्रतिखंडीवर होते.

तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहीले. बाजारातील आवकही काही प्रमाणात कमी होत आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचा दबाव देशातील बाजारावरही येत आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

कांद्याच्या भावावरील सरकारचा दबाव कायम आहे. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतरही भावपातळी कमीच आहे. सरकारची धोरण बेभरवशाची झाल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

कांद्याला कांद्याला सध्या सरासरी भावपातळी १२०० ते १६०० रुपयांच्या दरम्यान आहे. तसेच बाजाराताली कांदा आवकही चांगली सुरु आहे. त्यामुळे भावपातळी दबावात दिसून येत आहे. 

तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. तुरीचे भाव मागील काही आठवड्यांपासून उचांकी पातळीवरून काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र आजही भाव १० हजारांच्या आसपास आहेत. बाजारातील तुरीची आवकही घटली आहे.

त्यामुळे देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात गव्हाची भावपातळी कायम आहे.देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे सरकारची गहू खरेदीही सुरु आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे. सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत.

देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT