Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

Daily Commodity Rates: आज आपण पपई, मका कणीस, कारली, कोथिंबीर आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

थोडक्यात माहिती...

  • पपईच्या दरात २ ते ती३ रुपये प्रति किलोने वाढ झाली असून, शेतकऱ्यांना सध्या १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

  • कारलीची बाजारात आवक कमी असूनही तिचा दर ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे.

  • मका कणसाला सध्या चांगली मागणी असल्याने त्याला १ हजार ५०० ते २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

  • कोथिंबीरचे दर सध्या स्थिर असून, सरासरी दर १ हजार ५०० ते २ हजार रुपये प्रति क्विंटल आहे.

  • तुरीच्या दरात सध्या मंदी कायम असून, सध्याचे दर हमीभावापेक्षा १ हजार ते १ ५०० रुपयांनी कमी आहेत.

Market Bulletin

पपई दरात सुधारणा

पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे. त्यामुळे पपईच्या दरात वाढ झाली आहे. सध्या राज्यात पपईचे उत्पादन कमी आहे. त्यातही दर्जेदार पपईची टंचाई भासत आहे. राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे. उत्तर भारतातूनही मागणी आहे. यामुळे पपई दरात किलोमागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर सध्या १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. श्रावणमास व अन्य कारणांमुळे पपईला मागणी आहे. दुसरीकडे बाजारात पपईची आवक कमी आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात, असा अंदाज पपई बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

कारली दर टिकून

राज्यातील बाजारात कारलीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे कारलीली उठाव चांगला आहे. कारली पिकाला काही भागात पावसाचा आणि कमी पाण्याचाही फटका बसत आहे. त्यामुळे तोडा कमी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या राज्यात केवळ पुणे, मुंबई आणि नाशिक बाजारांमध्येच कारल्याची आवक १०० क्विंटलपेक्षा जास्त आहे. इतर बाजारांमधील आवक खूपच कमी आहे. त्यामुळे सध्या कारलीला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

मका कणीस तेजीत

मका कणसाला बाजारात सध्या चांगली मागणी आहे. पावसामुळे मका कणसाला उठाव मिळतो. यंदाही मका कणसाला मोठ्या शहरांमध्ये चांगली मागणी आहे. पुणे, नाशिक, मुंबई या बाजारांमध्ये सध्या आवक होत आहे. मात्र सध्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे मका कणसालाही चांगला भाव मिळत आहे. सध्या मका कणीस प्रतिक्विंटल १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कणसांची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते. त्यामुळे दरही काहीसे टिकून राहण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

कोथिंबीरचे दर स्थिर

राज्यातील बाजारात कोथिंबरची आवक काहीशी वाढलेल दिसत आहे. मात्र बाजारात कोथिंंबीरला चांगला उठाव मिळत आहे. यामुळे दरही टिकून आहेत. सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये कोथिंबरची आवक काहीशी वाढलेली आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपये दर मिळत आहे. तर प्रतिजुडी ४ रुपये ते ५ रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही आठवड्यांनंतर बाजारातील कोथिंबीरची आवक वाढण्याचा अंदाज आहे. मात्र पुढील २ ते ३ आठवडे बाजारातील आवक स्थिर राहू शकते. त्यामुळे कोथिंबीरचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

तुरीच्या दरात मंदी कायम

तुरीचे भाव देशात मंदीतच आहेत. वाढती आयात आणि उत्पादन वाढीचा अंदाज यामुळे देशात पुरवठा चांगला राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षभरात विक्रमी आयात झाली. तसेच सरकारचे तूर आयातीचे खुले धोरण कायम आहे. याचा दबाव दरावर आहे. तुरीचा भाव हमीभावापेक्षा किमा १ हजार ते दीड हजार रुपयाने कमी आहे. सध्या बाजारातील आवक कमी असूनही तुरीचे दर ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यापुढील काळात तुरीची आवक आणखी कमी होणार आहे. मागणी चांगली आहे. त्यामुळे सध्याच्या पातळीवरून दरात सुधारणा होऊ शकते. मात्र, फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. पपईचे दर सध्या किती आहेत?
शेतकऱ्यांना सध्या पपईसाठी १६०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे.

२. कारलीचे दर टिकून का आहेत?
आवक कमी असूनही मागणी चांगली असल्यामुळे कारलीचे दर टिकून आहेत.

३. मका कणीसाचे दर का वाढले आहेत?
पावसाळ्यातील मागणी आणि मोठ्या शहरांमधील वाढती खरेदी यामुळे दर चांगले मिळत आहेत.

४. तुरीचा भाव हमीभावापेक्षा का कमी आहे?
वाढती आयात आणि उत्पादनात वाढ यामुळे तुरीच्या दरावर दबाव असून ते हमीभावापेक्षा १००० ते १५०० रुपये कमी आहेत.

५. कोथिंबीरचे दर पुढे काय राहतील?
पुढील २ ते ३ आठवडे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे, कारण आवक व मागणी दोन्ही संतुलित आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Impact: कधी दुष्काळ तर धो-धो पाऊस का बरसतो?

Agriculture Degree Admission: कृषी पदवीसाठी अर्ज भरण्यास रविवारपर्यंत मुदतवाढ

Harshvardhan Sapkal: कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा

Krushi Samruddhi Scheme: भांडवली गुंतवणुकीची ‘कृषी समृद्धी’ जाहीर

Rummy Viral Video: रमी खेळल्याचा आरोप बिनबुडाचा

SCROLL FOR NEXT