Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा भावात आज सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत डाळिंब दर

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, डाळिंब आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. बुधवारच्या तुलनेत सोयाबीन, सोयापेंडचे भाव काहीसे नरमले होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहिसे दर कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७२.७४ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदे ५८ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

कांद्यात सुधारणा

कांद्याच्या  भावात आज काहिशी सुधारणा झाली होती. मागील आठवडाभर कांद्याच्या भावात चढ उतार कायम होते. खरिपातील कांदा देशात काही बाजारांमध्ये दाखल झाला. तर अफगाणिस्तानातूनही कांदा आयात होत असल्याचे वृत्त आले होते. याचा दबाव कांद्यावर आला होता. पण आता कांदा बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात आज सुधारणा दिसून आली. कांद्याचे भाव आज ३ हजार ९०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या दरात सुधारणा

टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाल मोठा फटका दिला. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली. मात्र दुसरीकडे टोमॅटोला उठाव कायम आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

डाळिंबाचा भाव टिकून

राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाचा भाव १० हजारांपेक्षाही जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT