Onion Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : निर्यातबंदीनंतर कांदा बाजारातील पडझड सुरुच

Onion Rate : राज्याच्या इतर बाजारातही क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांनी भाव कमी झाले. नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आज २ हजार ते २ हजार ३०० रुपये सरासरी भाव मिळाला.

Team Agrowon

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १३.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ४१७ डाॅलरपर्यंत वाढले होते. सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झाल्याचा परिणाम देशातील बाजारातही दिसला. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव आज ५० रुपयांनी वाढवले होते.

बाजार समित्यांमध्ये मात्र भावपातळी कायम होती. आजही बाजारसमित्यांमध्ये सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव टिकल्यास बाजार समित्यांमधील भावातह सुधारण होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. तर देशातील बाजार समित्यांमधील भावपातळी अद्यापही दबावातच दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारी ८१.८५ सेंट प्रतिपाऊंड होते. तर देशातील वायदे आज ५७ हजारांवर पोचले होते. दुपारपर्यंत वायद्यांमध्ये काहिशी वाढ झाली होती. पण बाजार समित्यांमध्ये भाव स्थिर होते.

कापसाला आजही ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. बाजारातील आवक कापूस कायम आहे. बाजारातील कापूस आवक आणि कापसाला असलेला उठाव पाहता, ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, अशा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने थेट ऊस आणि उसाच्या रसापासून इथेनाॅल निर्मितीवर बंदी घातली. यामुळे इथेनाॅल निर्मीती कमी होऊ शकते. पण केंद्राने आपले इथेनाॅल निर्मितीचे उद्दीष्ट कायम ठेवले आहे. परिणामी मक्यापासून इथेनाॅल निर्मिती वाढू शकते, असा अंदाज आहे. एक टन महिन्यापासून जवपास ३८० लिटर इथेनाॅल मिळते.

त्यामुळे इथेनाॅलसाठी मक्याला मागणी वाढू शकते. याचा आधार मका बाजाराला मिळू शकतो. ही बातमी आल्यानंतर काही बाजारात मक्याच्या किमान भावात सुधारणा झाली. पण सरासरी दरपातळी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. मक्याच्या भावात पुढील काळात आणखी २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव आजही क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी कमी झाले. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ही घट विशेष दिसली. तर राज्याच्या इतर बाजारातही क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांनी भाव कमी झाले. नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आज २ हजार ते २ हजार ३०० रुपये सरासरी भाव मिळाला.

निर्यातबंदीचा परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करत आहेत. पण केंद्र सरकारकडून अद्यापही त्याविषयी काही निर्णय घेण्यात आला नाही. लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे.

देशातील काही भागात नव्या तुरीची बाजारात आवक सुरु झाली. ही आवक खूपच कमी आहे. पण जानेवारीत आवक वाढायला सुरुवात होईल. जानेवारीनंतर आवेकचा दबाव वाढेल. नवा माल तोंडावर असल्याने तुरीच्या भावात सध्या काहीशी नरमाई दिसते. पम अजूनही भाव ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहे. देशात यंदा तुरीची लागवड कमी असून उत्पादकताही घटली आहे.

परिणामी उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. यामुळे तुरीच्या भावात मोठी घट होईल, अशी शक्यता दिसत नाही. पण उत्पादन घटूनही बाजारातील आवकेचा दबाव जास्त राहील्यास भावात आणखी काहिशी नरमाई येऊ शकते. पण ही नरमाई काही दिवस असेल. यंदा उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ विरोधासाठी मोहोळमध्ये ‘रास्ता रोको’

Shaktipeeth Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात महिलांनी अडवला रस्ता

Food Safety First: भेसळयुक्त अन्न रोखण्यासाठी २० जण तैनात

Mixed Cropping: मिश्र पीक पद्धतीचा अंगीकार करावा 

VIP Darshan: पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करा

SCROLL FOR NEXT