Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: मक्याचे दर दबावातच; उडीद, चिंच, आले तसेच काय आहेत आजचे कोबीचे भाव?

Daily Commodity Rates: आज आपण उदीड, मका, चिंच, आले आणि कोबी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

उडदाचे दबावातच

देशातील बाजारात उडदाचे भाव दबावातच आहेत. चालू हंगामात उडदाला हमीभाव मिळालाच नाही. सरकारने यंदा उडदाला ७ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र बाजारात सध्या सरासरी ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा देशातील उत्पादन चांगले राहीले. महत्वाचे म्हणजे आयात वाढली. त्यामुळे देशात उडदाचा पुरवठा चांगला आहे. परिणामी उडदाच्या भावावर दबाव आला. उडीद बाजारातील ही परिस्थिती आणि काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे, असे उडीद बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

मका दर कमीच

मक्याचा बाजार मागील दोन आठवड्यांपासून स्थिर दिसत आहे. बहुतांशी बाजारातील दरपातळी टिकून आहे. बाजारामध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येत आहे. यंत्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आला. सध्या मक्याला बाजारात सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या भाव मिळत आहे. महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे. मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

चिंचेच्या दरात चढ उतार

बाजारातील चिंचेची आवक मर्यादीत दिसत आहे. मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे चिंचेच्या दरात काहीसे चढ उतार सुरु झाल्याचे दिसत आहे. चिंचेचे दर अनेक बाजारात काहीसे कमी झाले आहेत. दुसरीकडे बाजारातील आकही कमी आहे. पण चिंचेला सध्या ७ हजार ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. तर पावसामुळे मागणीही स्थिर राहू शकते. परिणामी चिंचेच्या दरात चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आले दरात सुधारणा

बाजारातील आल्याची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी दिसत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याला उठाव आहे. याचा आधार आल्याच्या भावाला मिळत आहे. मागील दोन आठवड्यांपासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. आल्याचे भाव सध्या ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. सध्या आल्याला उठाव आहे. तसेच पुढील काळात बाजारातील आवकही कमी होणार आहे. त्यामुळे आल्याच्या भावात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कोबीचे दर दबावात

बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादीत दिसत आहे. याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे. कोबीचे दर मागील काही आठवड्यापासून दबावातच दिसत आहेत. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT