Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्याच्या भावातील सुधारणा कायम ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच गहू दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, हळद आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार कायम आहेत. मागील काही दिवसांपासून कापूस भाव दबावातच आहे. आज दुपारी ७०.९१ सेंटवर होते. देशातील वायदेही ५८ हजार ५० रुपयांपर्यंत कमी झाले होते. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवकही कमी झाली आहे. पण सध्या कापसाला उठाव कमीच असल्याचे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगण्यात येत आहे. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

सरकारने गव्हावर स्टाॅक लिमिट लावल्यानंतर गव्हाच्या भावात काहीशी स्थिरता दिसून येत आहे. गव्हाचे भाव कमी झाले नाही तर तेजी थांबलेली दिसते. बाजारातील गव्हाची आवक आजही कमीच होती. पण गव्हाला मागणी चांगली आहे. प्रक्रिया उद्योगांनाही गव्हाची आवश्यकता आहे. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

नव्या हंगामातील हळद लागवड सुरु झाली. मागील वर्षभर हळदीला चांगला भाव मिळाला त्यामुळे यंदा हळद लागवड वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या हळदीची लागवड कशी होते याकडे बाजाराचे लक्ष आहे. पण दुसरीकड सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. त्यामुळे दरातील तेजी चढ उतार सोडले तर कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या हळदीला सरासरी १३ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीच्या भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशात मक्याला सध्या चांगली मागणी आहे. मक्याचा वापर इथेनाॅल निर्मितीसाठी वाढत आहे. उसाचे उत्पादन कमी झाल्याने इथेनाॅल उद्योगाने आपला मोर्चा मक्याकडे वळवला. परिणामी पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योगासोबतच इथेनाॅलमध्येही मागणी वाढली. याचा आधार भावाला होत असून सध्या मका २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केद्रांवर मका २८०० रुपयांनी विकला जात आहे. मक्याच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT