Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्याचा बाजार टिकून; कापूस, सोयाबीन, आले तसेच काय आहे लसूण दर ?

Daily Commodity Rates : आज आपण सोयाबीन, कापूस, आले, लसूण आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीनचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आज सोयाबीनचे वायदे ९.९३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस स्थिर

कापसाचे भाव मागील आठवडाभरापासून दबावातच आहेत. कापसाला आजही देशातील बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर सीसीआयची खरेदीही सुरु आहे. त्यामुळे कापूस बाजाराला एक आधार मिळत आहे. बाजारातील आवकही रोज जवळपास १ लाख ८० ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आले भाव पडले

आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून दबावात आले आहेत. नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दर कमी झाले आहेत. यंदा राज्यात यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज आधिपासून व्यक्त केला जात होता. बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला. सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. 

मक्याचे दर टिकून

मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिरावल्याचे खरेदीदार सांगत आहेत. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मक्याची बाजारातील आवकही स्थिरावली आहे. तर मालाची गुणवत्ता सध्या चांगली आहे. त्यामुळे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव आणखी सुधारतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

लसूण तेजीतच

बाजारातील लसणाची आवक कमी आहे. त्यामुळे लसणाच्या भावात चांगली तेजी आली आहे. लसणाला घाऊक बाजारात २४ हजार ते २८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचे भाव जास्त असल्याने देशात लसणाची लागवड वाढत असल्याचे चित्र आहे. पण नवा माल बाजारात येण्याला आणखी उशीर आहे. तर सध्याची उपलब्धताही मर्यादीत आहे. त्याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे. त्यामुळे लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT