Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : नाफेडच्या खरेदीचा हरभऱ्याला आधार मिळतोय का?

Anil Jadhao 

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दबावात (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड दरात चढ-उतार सुरु आहेत. अमेरिकेतील दोन बॅंका बुडाल्यामुळे बॅकिंग क्षेत्र सध्या संकटाचा सामना करत आहेत. त्याचा परिणाम बाजारावर होत आहे. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १४.६५ डाॅलर प्रतिबुशेल्स होते.

तर सोयापेंड वायद्यांनी ४६० डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये क्विंटल दर मिळतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवरचा दबाव जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे दरात नजीकच्या काळात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दर स्थिरावले (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापूस दरात काहीशी सुधारणा दिसली. कापूस वायद्यांनी आज दुपारपर्यंत ७८.२१ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र कापसाचे दर आजही स्थिर होते.

कापसाला आज ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये क्विंटल भाव मिळतोय. सध्या बाजारात वाढलेली आवक, आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई आणि निर्यात घटल्याचा दबाव कापूस बाजारावर आहे. पुढील काळात कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) डाळिंबाचे दर तेजीतच (Pomegranate rate)

मागील काही दिवसांपासून बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. मात्र डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळं डाळिंबाचे भाव तेजीत आहेत. सध्या डाळिंबाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ते ९ हजार रुपये भाव मिळतोय.

यंदा डाळिंब उत्पादन घटल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. त्यामुळं पुढील काही दिवस डाळिंबाची आवक कमी राहील. त्यामुळे डाळिंबाच्या दरातील तेजी टिकून राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

४) पालकची आवक वाढली

पालक भाजीला सध्या सरासरी दर मिळतोय. मागील काही दिवसांपासून पालकची बाजारातील आवक काहीशी अधिक आहे. त्यामुळं दरावर दबाव आहे. सध्या राज्यातील पुणे, राहता, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर बाजारात आवक जास्त आहे.

त्यामुळं पालकला सरासरी प्रति क्विंटल १ हजार ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात पालकची आवक कमी राहून दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) हरभरा बाजारात स्थिती काय राहू शकते?

नाफेडने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हमीभावाने हरभरा खरेदी सुरु केली. पण सध्या हरभरा खरेदीची गती कमी आहे. नाफेडने या चार राज्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १२ हजार टन हरभरा खरेदी केला.

यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४० हजार ७०० टन हरभरा खरेदी करण्यात आला. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. देशातील एकूण हरभरा लागवड क्षेत्रापैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं यंदा राज्यात चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत आंध्र प्रेदशात ३१ हजार टन आणि गुजरातमध्ये २५ हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली. तर कर्नाटकात नाफेडने १६ हजार टन हरभरा खरेदी केला. देशातील बाजारात हरभरा आवक आता वाढत आहे. त्या तुलनेत नाफेडची खेरदी धिम्या गतीने सुरु झाली.

इतर राज्यांमध्ये अद्याप खेरदी सुरु झाली नाही. देशात यंदा विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज सरकारनं व्यक्त केला. पण वाढती उष्णता आणि पावसामुळे पिकाला फटका बसला. सरकारनं यंदा हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला.

पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार ६०० ते ५ हजार रुपये भाव मिळतोय. नाफेडची खरेदी वाढल्यानंतर आणि प्रतिकूल हवामानामुळे हरभरा पिकाला किती फटका बसला, हे स्पष्ट झाल्यानंतर दर वाढू शकतात. व्यापारी आणि अभ्यासकांनी ही माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT