Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याच्या भावात सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे तूरीचे दर

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये वाढ

भारत सरकारने हमीभावाने सोयाबीन खेरदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच शुक्रवारी खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्के वाढ केली. सोयाबीनच्या दराला आधार मिळाला. सरकारने हे दोन्ही निर्णय जाहीर केल्यानंतर सोयाबीन भावात ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. भारताने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि पामतेलाचे भाव कमी झाले आहेत. 

कापसात चढ उतार 

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे वाढले होते तर देशात काहीसे नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ७१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे कमी होऊन ५८ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक नगण्य होत आहे. तरीही कापासचे भाव ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावात सुधारणा

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढून टाकले. तसेच निर्यात शुल्कही ४० टक्क्यांवरून २० टक्के केले. यामुळे कांदा बाजारात मागील ती दिवसांमध्ये कांद्याचा भाव ५०० रुपयांनी वाढला आहे. राज्यातील बाजारात आज कांद्याचा भाव सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होता. यापुढच्या काळातही कांद्याच्या भावात चांगली सुधारणा अपेक्षित आहे. कारण देशात सध्या कांद्याचा स्टाॅक कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चांगली तेजी अपेक्षित आहे, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

तुरीचा भाव स्थिरावला

तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता. तसेच आयातही सुरु आहे. याचा दबाव दरावर आला. पण भाव १० हजारांच्या दरम्यान राहीले होते. मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. तुरीचा सरासरी भाव १० हजार ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.  

केळीला उठाव कायम 

बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे. केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती. सध्या गणेशोत्सवामुळे भावही चांगले आहेत. तर यापुढे नवरात्रीमुळेही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी केळीला सध्या १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT