Tur Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Rate : तुरीतील तेजी कधीपर्यंत टिकेल?

देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तुरीच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. परंतु बाजारातील आवक मात्र कमीच दिसत आहे. आयातही मर्यादित होत आहे. आफ्रिकेतील देशांमधील तूर आता काढणीला आलीय. त्यामुळे पुढील महिन्यापासून आयात वाढण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

कापसाचे दर नरमले

1. कापसाचा कमाल आणि किमान दरात एक हजार रूपयांची नरमाई दिसतेय. गेल्या आठवड्यात देशात कापसाचा किमान दर प्रति क्विंटल ८ हजार रुपये होता. तर कमाल दर सरासरी १० हजार रूपये होता. मात्र बाजारात कापसाची आवक वाढतेय. तसंच उद्योगाकडून अजून मागणी वाढलेली नाही. त्यामुळं दरात नरमाई दिसतेय. सध्या कापसाचा किमान दर ७ हजार रुपयांपर्यंत आलाय तर कमाल दर ९ हजारांपर्यंत आहे. कापसाची आवक वाढल्यानंतर दर काही काळ दबावात येऊ शकतील मात्र शेतकऱ्यांना हंगामात सरासरी ९ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

आले दर दबावातच

2. आल्याचे दर मागील पाच वर्षांपासून दबावात आहेत. कोरोनाआधी आल्याला प्रतिक्विंटल ६ हजार ते ७ हजार रुपये दर मिळत होता. मात्र कोरोनाकाळात आल्याचे दर ६०० ते ८०० रुपये या निचांकी पातळीपर्यंत पडले होते. तेव्हापासून आल्याच्या दरातील मंदी कायम आहे. सध्या आल्याची आवक मर्यादीत आहे. तरीही दरात सुधारणा दिसून आली नाही. सध्या आल्याला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपये दर मिळतोय. आले दरात सध्यातरी फार मोठ्या तेजीची शक्यता नाही, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

सोयाबीन दर स्थिरावले

3. देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार एका भावपातळीभोवती फिरत आहे. सध्या सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल ४ हजार ७०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय. देशातील काही बाजारांमध्ये नवं सोयाबीन विक्रीला येत आहे. मात्र या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक दिसतोय. त्यातच नव्या हंगामातील उत्पादनाचा निश्चित अंदाज येत नाही तोपर्यंत उद्योग सावध खरेदी करतील, त्यामुळं सध्या दर नरमलेले आहेत, असं जाणकारांनी सांगितलं. शेतकऱ्यांना यंदा किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

हरभरा दरातील मंदी कायम

4. हरभरा बाजार सध्या किमान दरावर स्थिर आहे. खुल्या बाजारात हरभरा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता दिसत असली तरी नाफेडच्या खरेदीचा परिणाम होतोय. नाफेडकडे सध्या हरभऱ्याचा मोठा साठा आहे. नव्या हंगामात खरेदीसाठी नाफेड गोदामं रिकामी करतंय. त्यामुळं सध्या हरभरा ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. नाफेडच्या विक्रीमुळं दरवाढीला ब्रेक बसतोय. त्यामुळं हरभरा दरात मोठी सुधारणा होण्याची शक्यता सध्या दिसत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं.

तुरीतील तेजी कधीपर्यंत टिकेल?

5. देशात सध्या तुरीची टंचाई (Tur Shortage) वाढतच आहे. त्यामुळं तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. सध्या तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. मात्र स्टाॅकिस्ट तुरीचा साठा (Tur Stock) हळूहळू बाहेर काढत आहेत. तसचं बर्मा आणि म्यानमारमध्ये तुरीचा साठा कमी असल्यानं आयातही (Tur Import) कमी होतेय. यंदा एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये तुरीची १ लाख १० हजार टन आयात झाली. तर गेल्या वर्षी याच पाच महिन्यांमधील आयात ही दीड लाख टनांवर होती. यंदा एप्रिल महिन्यात ५५ हजार टन तूर आयात झाली होती. त्यानंतर आयातीत घट होत गेली.

भारताला प्रामुख्यानं टांझानिया, मोझांबिक, मालावी, सुदान आणि केनिया या आफ्रिकी देशातून तूर आयात होत असते. या देशांमधील तूर आता काढणीला आली आहे. त्यामुळं पुढील काही महिन्यांमध्ये तुरीची आयात वाढेल. मात्र भारतातील तुरीची टंचाई लक्षात घेता आयात होणारी तूरही स्वस्त मिळणार नाही, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. त्यातच देशात यंदा तूर लागवड कमी झालीय. लागवडी उशीरा झाल्यानं हंगामही उशीरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुरीच्या दरतील तेजी यंदा टिकून राहण्याचा अंदाज आहे. जाणकारांच्या मते शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Wildlife: राज्यात दोन नवीन अभयारण्ये; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

Drought Agriculture Guide : दुष्काळ, कमी पाण्याची पिके, चारा निर्मितीवर मार्गदर्शन

Bogami Nala Bridge : एकजुटीची ताकद! बोगामी नाल्यावर ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल

Girad Sitaphal Market : दुष्काळाची मोठी झळ! प्रसिद्ध गिरडच्या सीताफळाची गोडी महागली, आवक घटल्याने भाव कडाडले

Cotton Crop Crisis : शेतकरी हवालदील! सरासरी चारच बोंडे; यंदा कापसाला नुसता पालाच पाला!

SCROLL FOR NEXT