Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Landslides in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील एका गावात भूस्खलनामुळे ५८ हून अधिक घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. तर आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर करण्यात आले आहे.
Landslides
Landslides Agrowon

Pune News : देशात विविध राज्यात सध्या नैसर्गिक आपत्तींनी थैमान घातले आहे. महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. राज्यस्थानमध्ये उष्णतेची लाट आली आहे. तर उत्तराखंडमध्ये आगीचे लोट पसरले आहेत. देशात अशी नैसर्गिक आपत्ती आली असतानाच जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे. पेरनोट गावात जमीन खचल्याने ५८ हून अधिक घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर केले आहे. तसेच १०० हून अधिक घरांचे नुसकान झाले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेरनोट गावात गेल्या तीन दिवसांत जमीन खचण्याची घटना घडत आहे. येथे नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) निकष वापरले जात आहेत. तर नुकसानग्रस्त कुटुंबांना लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Landslides
Landslide In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ८८ गावांना भूस्खलनाचा धोका, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्वेक्षण

गुरुवारी संध्याकाळी हाहाकार

पेरनोट गावात गुरुवारी संध्याकाळी हाहाकार झाला. येथे भूस्खलनामुळे चार विजेचे टॉवर पडले, एक रिसीव्हिंग स्टेशन आणि मुख्य रस्त्याच्या काही भागाचे नुकसान झाले. सध्या उपायुक्त बसीर उल हक चौधरी यांच्या देखरेखीखाली जिल्हा प्रशासनाकडून सर्व बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सध्या मैत्राच्या कम्युनिटी हॉलमध्ये करण्यात आली आहे. तर पर्नॉट पंचायतीकडून मदत आणि सहाय्य सेवा चालवल्या जात आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Landslides
Phonda Ghat Landslide : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात दरड कोसळली, मार्ग बंद

तसेच येथे भूस्खलनामुळे ५८ हून अधिक घरांचे पूर्ण नुकसान झाले असून १०० हून अधिक घरांचे नुसकान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पेरनोट गावात गुरुवारी झालेल्या भूस्खलनामुळे चार विजेचे टॉवर पडले. यामुळे येथे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी जम्मू पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि उप-ट्रान्स उपविभागातील पथके तैनात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त चौधरी यांनी दिली आहे.

नियंत्रण कक्षाची निर्मिती

याव्यतिरिक्त, बचाव कार्यासाठी तसेच बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सैन्य, पोलीस, नागरी स्वयंसेवक आणि इतर संघटना एकत्रित करण्यात आल्या आहेत. याचबरोबर विस्थापित लोकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय पथक तयार करण्यात आले असून 24x7 नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com