Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: गवारचे बाजारभाव टिकून; केळी, बाजरी, कापूस तसेच काय आहेत सोयाबीनचे भाव?

Daily Commodity Rates: आज आपण सोयाबीन, कापूस, गवार, केळी आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही स्थिर दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनचा बाजार आजही ३ हजार ८०० ते ४ हजारांच्या दरम्यान होता. तर प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव आज ३० ते ५० रुपयांनी वाढवले होते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी ४ हजार ३०० ते ४ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान केली. देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढत आहे. सोयाबीनवरील दबाव कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाचे भाव स्थिर

कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सीसीआयच्या खरेदीत अडचणी निर्माण झाल्यानंतर कापसाच्या भावात काहीशी नरमाई आली होती. पण कापसाच्या भावात पुन्हा काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. मात्र कापसाचा भाव आजही शेतकऱ्यांना अपेक्षित अशा पातळीवर पोचला नाही. कापसाचा बाजारभाव ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर बाजारात आजही सव्वा लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक झाली होती. देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगली राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारचे भाव टिकून

बाजारातील गवारची आवक कमीच आहे. तर गवारला चांगला उठाव आहे. त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादीत दिसत आहे. इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे. बाजारातील आवक आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच काहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज आहे.

बाजरीला चांगली मागणी

बाजरीला थंडीमुळे सध्या काहीशी चांगली मागणी आहे. तर बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे. यंदाच्या खरिपात बाजरीचे उत्पादन वाढील्याचे अंदाज आहेत. मात्र बाजारीला उठावही चांगला मिळत आहे. त्यामुळे बाजारीचे भाव मागील ३ आठवड्यांमध्ये अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारले. आता बहुतांशी बाजारात बाजरीला २५०० रुपयांच्या पुढे दर मिळत आहे. तर सरासरी दरपातळी २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होती. रब्बीतील बाजारीची आवक सुरु होईपर्यंत बाजारीचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

केळीचे दर टिकून

केळीच्या भावात मागील तीन आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली. केळीला कुंभ मेळ्यानिमित्त उठाव चांगला आहे. यामुळे केळी दरात सतत वाढ झाली. तर बदलते वातावरण आणि नुकसान यामुळे केळीची आवक कमीच आहे. देशभरात सध्या राज्यातील केळीला उठाव दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली. दोन आठवड्यांपासून केळीचा बाजारभाव सध्या १६०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. केळीच्या आवकेत पुढील महिनाभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचाही परिणाम दरावर दिसेल, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT