
Chhatrapati Sambhajinagar News : कांदा, कापूस, पिकाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बळीराजा हतबल असताना उन्हाळी हंगामात मावसगव्हान (ता. पैठण) येथील धरणग्रस्त तरुण शेतकऱ्याने जायकवाडी धरणाच्या ५ एकर बुडित गाळपेरा क्षेत्रात उसाऐवजी उन्हाळी बाजरी पिकाचा प्रयोगाने शंभर क्विंटल बाजरीचे उत्पन्न काढले आहे.
लोहगाव परिसरातील पुनर्वसित मावसगव्हान येथील तरुण शेतकरी जगदीश सुरेश जाधव हे आपल्या शेतीत दरवर्षी नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग राबवत असतात.
त्यांनी या वर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडी धरण जलफुगवटा क्षेत्रात बुडित असलेली जमिनीतील पाणी धरणसाठा ६० टक्के झाल्यावर रिकामी होताच शेतीची मशागत करून फेब्रुवारीत ५ एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीची पेरणी केली होती. खते, निंदणी, केल्यावर स्प्रिंकलरच्या साह्याने पिकास पाणी दिले.
कणसे फुलोऱ्यात आली असतानाच अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे एक पाणी वाचले. तर जोमदार बहरलेले बाजरी पिकांचे कणसे केसाळ, कुसळाचे असल्यामुळे रान डुक्करे, पाखरांपासून पिकाचे नुकसान झाले नाही. त्यामुळे पीक संरक्षण करण्याची वेळ आली नाही.
त्याचा उत्पादनाला फायदा झाला या पिकाची रणरणत्या उन्हात सोंगणी, कापणी, करून उफनेरवर मजुरांच्या साह्याने पीक तयार केले. असता पाच एकरात शंभर क्विंटल बाजरी उत्पन्न निघाले, असे जाधव यांनी सांगितले.
ते म्हणाले, की यापूर्वी या क्षेत्रात उसाचे पीक लागवड करत होतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून धरण शंभर टक्के भरत असल्याने उसाचे पीक पाच ते सहा महिने पाण्यात राहिल्याने नुकसान होत होते. ते तोडण्यासाठी कारखान्याचे ऊस कामगार प्रचंड आर्थिक पिळवणूक करत होते. या सर्व अडचणींमुळे उन्हाळी बाजरीचा प्रयोग केला. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले.व जनावरांना चाराही निर्माण झाला यांचे मोठं समाधान मिळाल्याचे भावना जाधव यांनी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.