Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला दर; फ्लॉवरला उठाव; भेंडीची आवक घटली, कारली दरावर स्थिरता, मका कणीस तेजीत!

Daily Commodity Rates: आज आपण फ्लाॅवर, भेंडी, सिताफळ, कारली आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

थोडक्यात माहिती...

  • फ्लॉवरला २५००–३००० रुपये दर; आवक कमी, दर टिकून.

  • भेंडीची बाजारात मर्यादित आवक, दर ३३०० पर्यंत.

  • सिताफळ मुंबईत ७ हजारांवर विकले जात आहे; पुण्यात थोडा कमी दर.

  • कारली दर ३५०० पर्यंत स्थिर; फटका पावसाचा आणि पाण्याचा.

  • मका कणसालाही चांगला भाव; आवक कमी, मागणी जोरात.

Market Bulletin:

फ्लाॅवरला चांगला उठाव

राज्यातील बाजारात फ्लाॅवरची आवक कमीच आहे. पावसामुळे सर्वच भाजीपाल्याची आवक घटलेली आहे. त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. याचा आधार फ्लाॅवरला मिळत आहे. फ्लाॅवरची आवक कमी झाली असल्याने दरात सुधारणा झाली. सध्या फ्लाॅवरला सरासरी २५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे. पुढील काही आठवडे बाजारातील फ्लाॅवरची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे फ्लाॅवरचे दरही टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

भेंडीची आवक कमीच

भेंडीचे दर मागील २ आठवड्यांपासून बाजारात टिकून आहेत. पावसाचा फटका भेंडी पिकाला बसत आहे. परिणामी बाजारातील आवक मर्यादीत आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमधील भेंडीची आवक ५० क्विंटलपेक्षाही कमी आहे. केवळ पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अमरावती अशा बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसत आहे. त्यामुळे सध्या भेंडीला २ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. काही बाजारांमध्ये उच्चांकी अधिक आहे. मुंबई बाजारात सरासरी ३ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. बाजारातील भेंडीची आवक काही आठवडे मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

सिताफळाला चांगला भाव

राज्यातील बाजारांमध्ये सिताफळाची आवक सुरु झाली. सध्या आवकेचा दबाव कमी आहे. अनेक भागातील काढणी सुरु व्हायची आहे. तर सिताफळाला ग्राहकांचीही पसंती मिळत आहे. यामुळे दरही चांगले मिळत आहेत. सध्या सिताफळाला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. पुणे बाजारात सध्या चांगली आवक दिसत आहे. त्यामुळे सरासरी दर काहीसे कमी आहेत. मात्र मुंबई बाजारात सिताफळ सरासरी ७ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. सिताफळाची आवक पुढील काळात हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिताफळाच्या दरावरही दबाव येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

कारली दर टिकून

राज्यातील बाजारात कारलीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे कारलीली उठाव चांगला आहे. कारली पिकाला काही भागात पावसाचा आणि कमी पाण्याचाही फटका बसत आहे. त्यामुळे तोडा कमी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या राज्यात केवळ पुणे, मुंबई आणि नाशिक बाजारांमध्येच कारल्याची आवक १०० क्विंटलपेक्षा जास्त आहे. इतर बाजारांमधील आवक खूपच कमी आहे. त्यामुळे सध्या कारलीला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

मका कणीस तेजीत

मका कणसाला बाजारात सध्या चांगली मागणी आहे. पावसामुळे मका कणसाला उठाव मिळतो. यंदाही मका कणसाला मोठ्या शहरांमध्ये चांगली मागणी आहे. पुणे, नाशिक, मुंबई या बाजारांमध्ये सध्या आवक होत आहे. मात्र सध्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे मका कणसालाही चांगला भाव मिळत आहे. सध्या मका कणीस प्रतिक्विंटल १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कणसांची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते. त्यामुळे दरही काहीसे टिकून राहण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. फ्लॉवरचे दर वाढले का?
होय, कमी आवकेमुळे फ्लॉवरचे दर २५००–३००० रु./क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

२. भेंडीची बाजारातील स्थिती काय आहे?
भेंडीची आवक मर्यादित असून दर सरासरी ३ हजार रुपये आहेत.

३. सिताफळ कोणत्या बाजारात जास्त दराने विकले जात आहे?
मुंबईत सिताफळ ७ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे.

४. कारलीचे दर टिकतील का?
कारलीची आवक कमी असून दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

५. मका कणीस कुठे जास्त मागणीत आहे?
मुंबई, पुणे व नाशिक बाजारात मका कणसाला चांगली मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast : ऑगस्टमध्ये कमजोर, सप्टेंबरमध्ये वाढणार जोर

Vidarbha Rain Alert : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT