Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Chana Market : नव्या हरभऱ्याची बाजारात एन्ट्री

देशातील हरभरा उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल झाला. पण या हरभऱ्याला सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. मग नव्या हरभऱ्याला बाजारात काय दर मिळला? हरभऱ्याची दरपातळी काय राहू शकते?

Anil Jadhao 

देशातील हरभरा उत्पादन (Chana Production) यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल झाला.

पण या हरभऱ्याला सध्या हमीभावापेक्षा कमी दर (Chana Rate) मिळत आहे. मग नव्या हरभऱ्याला बाजारात काय दर मिळला? हरभऱ्याची दरपातळी काय राहू शकते? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले


आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरातील तेजी मंदी कायम आहे. पण आज सोयाबीन दरानं पुन्हा १५ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा पार केला.

मात्र देशातील सोयाबीनची दरपातळी वाढण्याचं नावचं घेईना. आजही सोयाबीनचे दर ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर उच्चांकी पातळीवर टिकल्यास देशातही दरपातळी वाढू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

2. कापूस दर स्थिरावले

देशातील बाजारात काल कापसाचे दर काहीसे कमी झाले होते. कमाल दरात काल क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली.

पण आज अनेक बाजारांमध्ये दर स्थिर होते. आज देशातील बाजारात कापसाचे सरासरी दर ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरातील चढ उतार कायम आहेत. देशातील दर सध्या नरमले तरी सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3. ज्वारीचे दर तेजीतच

देशातील खरिपातील ज्वारी उत्पादन यंदा घटले. तसेच रब्बीतील ज्वारी उत्पादनालाही फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

सध्या बाजारातील ज्वारी आवक कमी आहे. त्यामुळं ज्वारीचे दरही तेजीत आहेत. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

ज्वारीचे हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज ज्वारीच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.  

4. पपईला चांगला उठाव

बाजारातील पपईची आवक सध्या वाढत आहे. तसंच सध्या थंडी वाढल्यानं पपईला चांगला उठाव मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पपईचा पुरवठा कमी आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अकोला बाजारात पपईची आवक काहीशी जास्त आहे.

मात्र इतर बाजारांतील आवक २० क्विंटलपेक्षा कमी होतेय. त्यामुळं पपईला सरासरी १ हजार २०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज आहे. 

5. देशात यंदा हरभरा लागवड घटली. तसंच काही भागांमध्ये बदलत्या वातावरणाचा आणि कीड रोगांचा पिकावर प्रादुर्भाव झाला.

याचा हरभरा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतीमाल बाजारातील अनेक संस्था आणि अभ्यासक यंदा देशातील हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

गेल्या हंगामात देशात १३९ लाख टन हरभरा उत्पादन झालं होतं. तर यंदा उत्पादन १२० लाख टनांपेक्षाही कमी राहू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

देशात तुरळक ठिकाणी नवा हरभरा बाजारात दाखल होतोय. सध्या आवकेचं प्रमाण नगण्य आहे. या हरभऱ्याची गुणवत्ता चांगली आहे. मात्र ओलावा जास्त होता.

त्यामुळे मिळणारा दरही हमीभावापेक्षा कमीच आहे. सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला.

मात्र बाजारात नव्या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील महिनाभरात बाजारातील हरभरा आवक वाढेल.

ओलावाही कमी येईल. बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावरही दबाव येऊ शकतो. पण अभ्यासकांच्या अंदाजानुसार हरभरा उत्पादन कमी राहील्यास दर टिकतील.

तरीही पुढील महिनाभरात देशातील हरभरा उत्पादनाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरपातळीचाही अंदाज येऊ शकतो, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT