Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस वायद्यांना गाठला ६० हजारांचा टप्पा !

Market Bulletin : देशातील बाजारात कापूस दर मागील आवडाभरापासून वाढलेले आहेत. कापसाला वाढलेली मागणी आणि घटत चालेली आवक यामुळे दरात वाढ झाली.

Team Agrowon

1. सोयाबीन बाजारावरील दबाव

आठवड्याच्या शेवटी म्हणजेच आज  सोयाबीन आणि सायापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसले. सोयाबीनचे वायदे १३.२७ डाॅलर प्रतिबुशेल्स तर सोयापेंडचे वायदे ३९७ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीन आजही प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील सोयाबीन बाजारावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

2. तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० भाव

देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीला आजही प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीचे भावही ८ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आहेत. चालू हंगामातही तुरीची लागवड कमी दिसते. यामुळे यंदाही उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. परिणामी तुरीचे भाव पुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
 

3. देशातील बाजारात सध्या आल्याचे भाव तेजीत आहेत. यंदा आल्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारातील आवक कमी झाली. बाजारात आल्याची आवक कमी होताना दिसते. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. यामुळे आल्याला प्रतिक्विंटल सरासरी १३ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. आल्याचे भाव तेजीतच राहण्याचा अंदाज असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  

4. पेरुची आवक वाढली

सध्या बाजारातील पेरुची आवक वाढली. पेरूला काही बाजारांमध्ये उठावही जास्त दिसतो. त्यामुळे पेरुचे भाव काहीसे टिकून आहेत. पण एकूणच भावपातळी सरासरीपेक्षा कमी आहे. पेरुला सध्या २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळतो. पेरुची बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळ ही भावपातळीही टिकून राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

5. कापसाचे वायदे १६० रुपयांनी वाढले

देशातील बाजारात कापूस दर मागील आवडाभरापासून वाढलेले आहेत. कापसाला वाढलेली मागणी आणि घटत चालेली आवक यामुळे दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्येही सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे पुन्हा ८६ सेंटवर पोचले होते. तर देशातील वायद्यांनी ६० हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. एमसीएक्सवरील कापसाचे वायदे दुपारपर्यंत १६० रुपयांनी वाढले होते. कापूस वायद्यांनी आज ६० हजार ३८० रुपयांवर पोचले.

आज वायदे बाजाराचा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या सत्रात चढ उतार दिसू शकतात. मागील चार महिन्यांमध्ये कापूस भावाने खूपच कमी वेळा ६० हजारांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमधील भावातही मागील आठवडाभरात ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे ही वाढ चालू आठवड्यात कायम आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. कमाल भाव अनेक बाजारांमध्ये ७ हजार ५०० रुपयांच्या पुढे आहेत. कापसाच्या भावातील ही वाढ पुढील काळातही टिकून राहू शकते. तसेच दरात काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT