Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम आहेत. शुक्रवारी कापूस वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायद्यांमधील भावपातळी ६१ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर आले.

तर बाजार समित्यांमधील भावपातळीत काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनमधील कायम आहे. सोयाबीनची आवकही सरासरीच्या तुलनेत चांगली दिसत आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. तरीही सोयाबीन ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. शुक्रवारी सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव नरमले होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे.

तर सरासरी भावपातळी  एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

ज्वारीचे भाव आजही दबावातच आहेत. बाजारातील आवकहीही जास्त आहे. सध्याची आवक चांगली असल्याचा परिणाम दरावर दिसून येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

ज्वारीचा बाजार सध्या वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी २ हजार १०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव आहे.  ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत. तर बाजारातील आवक वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासू लसणाचे भाव क्विंटलमागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत. किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे.

सध्या बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील, असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Sugarcane Price: प्रतापगड कारखान्याचा प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर

Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Flood Relief: भूम तालुक्यात पूरग्रस्तांना ९० कोटींचे अनुदान वाटप

Loan Recovery Issue: कर्जमाफीची घोषणा; तरीही ऊसबिलातून वसुली सुरूच!

SCROLL FOR NEXT