Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Anil Jadhao 

Market Bulletin : देशातील काही बाजारांमध्ये दोन दिवसांमध्ये कापूस भावात क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली होती. वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. तर दुसरीकडे मार्चएन्ड नंतर कापसाला उठाव मिळत आहे. बाजारातील आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे.

आज कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. यापुढच्या काळातही कापसाच्या भावातील चढ उतार सुरु राहतील. मात्र दरात वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहेत. काही बाजारांमध्ये दरात क्विंटलमागं५० रुपयांपर्यंत चढ उतार दिसत आहेत. मात्र सरासरी भावपातळी एकाच मार्यादेत फिरताना दिसत आहे.

बाजारातील आवक सध्याही सरासरीपेक्षा जास्त दिसते. तर बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यातच बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसते. त्यामुळे आल्याचे भावही टिकून आहेत. तसं पाहीलं तर मागील चार आठवड्यांच्या तुलनेत भावत काहीसे कमी झालेले दिसतात.

पण सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ज्वारीची बाजारातील नरमाई कायम आहे. ज्वारीची बाजारातील आवकही दिवसेंदिवस वाढत आहे. ज्वारीचे उत्पादनही चांगले असल्याचे सध्यातही व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. पण बाजारातील आवक पुढील काळात कशी राहते हे पाहावे लागेल.

पण यामुळे दरावर दबाव आला. ज्वारीला सध्या वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.  ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे.

तर सरासरी भावपातळी  एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT