Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Anil Jadhao 

Market Bulletin : देशातील सोयाबीन बाजारावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा वाढलेला पुरवठा, खाद्यतेलातील मंदी आणि धीमी मागणी याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन ४ हजार ३०० ते ४ हाजर ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. मार्च एन्ड आणि मागणीतील बदलाचा परिणाम देखील कापूस बाजारावर दिसून येत आहे. याचा परिणाम वायद्यांसह प्रत्यक्ष कापूस खरेदीतवरही जाणवत आहे. देशातील बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. तरीही कापूस भाव ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहे. बाजारातील ही स्थिती आणखी एक किंवा दोन आठवडे राहू शकते, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यातच बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसते. त्यामुळे आल्याचे भावही टिकून आहेत. तसं पाहीलं तर मागील चार आठवड्यांच्या तुलनेत भावत काहीसे कमी झालेले दिसतात. पण सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

केंद्र सरकारने निर्यातबंदी कायम ठेऊन ५ लाख टन कांदा खरेदीला परवानगी दिली. पण याचा फायदा कांदा बाजाराला झाला नाही. कारण कांद्याचा बाजार स्थिर दिसतो. सध्या देशातील बाजारात कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ११०० ते १४०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर सरकारचा दबाव आणि बाजारातील कांदा आवक कायम असेपर्यंत कांद्याचा याच पातळीदरम्यानच राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत असल्याने बाजारावर दबाव वाढत आहे. यामुळे तुरीच्या भावातील तेजी स्थिरावली आहे. तुरीचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते ९ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दुसरीकडे बाजारातील आवक स्थिर आहे. तरीही बाजारभाव स्थिर आहेत. तूर बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT