Onion buffer stock : केंद्र सरकार खरेदी करणार ५ लाख टन कांदा; नाफेड आणि एनसीसीएफला निर्देश

Central Government On Onion : कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आली आहे. त्यावरून सध्या केंद्रातील मोदी सरकारवर विरोधात शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. यादरम्यान केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक करण्याची घोषणा मंगळवारी (ता.२६) केली. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन थेट शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारने दावा केला.
Onion buffer stock
Onion buffer stockAgrowon

Pune News : केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. कांदा निर्यात बंदीला पुढील सूचना येईपर्यंत अनिश्चित काळासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. यावरून राज्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने केंद्राच्या  निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासह कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून बफर स्टॉकसाठी ५ लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी कांदा खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

५ लाख टन कांदा

याबाबत ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह म्हणाले, "रब्बी हंगामातील उत्पादनांमधून शेतकऱ्यांकडून बफर स्टॉकसाठी ५ लाख टन कांदा खरेदी करणार आहोत. या खरेदीसाठी सरकारने मंगळवारी नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांना थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तर ही खरेदी एक-दोन दिवसांत औपचारिकपणे सुरू केली जाईल'" असेही सिंह म्हणाले. 

Onion buffer stock
Onion Market : कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्याचे ८ लाखांचे चेक बाऊन्स; शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ

तसेच, कांदा निर्यातबंदीमुळे कांदा दरातील संभाव्य घसरण लक्षात घेऊन सरकारने कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. गेल्या रब्बी हंगाम २०२३-२४ (जुलै-जून) मध्ये कांद्याचे उत्पादन २० टक्क्यांनी घसरले होते. यामुळे १९०.५ लाख टन कांद्याचे उत्पादन होईल असा अंदाज होता.

Onion buffer stock
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीत वाढ

पण २३७ लाख टनांपर्यंत उत्पादन पोहचले आहे. देशात वर्षभर कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रब्बी हंगामातील कांदा अत्यंत महत्त्वाचा आहे. वार्षिक उत्पादनाच्या सुमारे ७५ टक्के आहे. साठवणुकीच्या दृष्टीनेही खरीप हंगामातील कांद्यापेक्षा रब्बी कांदा चांगले असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. 

कांदा निर्यात बंदी कायम 

कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे कांदा दरात वाढ होऊ नये, यासाठी निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी कायम ठेवण्याचा निर्णय विदेश व्यापार महासंचालनालयाने घेतला. या निर्णयाने मात्र शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com