Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Agriculture Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा एकदा १२ डाॅलरच्या दरम्यान पोचले होते. तर सोयापेंड ३३९ डाॅलरच्या दरम्यान होते. सोयातेलाच्या वायद्यांमध्येही सुधारणा दिसून आली होती.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा एकदा १२ डाॅलरच्या दरम्यान पोचले होते. तर सोयापेंड ३३९ डाॅलरच्या दरम्यान होते. सोयातेलाच्या वायद्यांमध्येही सुधारणा दिसून आली होती. पण वाढलेला भाव मागील काही आठवड्यांपासून टिकताना दिसत नाही. देशातील बाजारातही प्रक्रिया प्लांट्सचे भाव कमी जास्त होत आहेत.

तर बाजार समित्यांमधील भावापतळी स्थिर दिसते. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे व्यवहार ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पार पडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे टिकल्यानंतर देशातील बाजारातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ९२.५६ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचले होते. तर काॅटलूक ए इंडेक्सही टिकून आहे. देशातील बाजारातही कापूस भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत.

बाजारातील आवक कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कापसाचे भावही टिकून आहेत. सध्या कापसाला सरासरी भाव ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील उत्पादन कमी राहूनही मक्याचा बाजारा मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. तसं पाहीलं तर मक्याला देशात सध्या चांगली मागणी आहे. इथेनाॅलसाठी यंदा मक्याला चांगला उठाव मिळत आहे. तर पोल्र्टी आणि स्टार्च उद्योगाकडूनही मागणी आहे.

बाजारातील आवकही टिकून आहे. सध्या मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सरकारने तुरीच्या भावावरील आपली पकड घट्ट केली आहे. तुरीच्या बाजारात तेजी येणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. यामुळे तुरीच्या भावातील तेजी स्थिरावली आहे. तुरीचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते ९ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

दुसरीकडे बाजारातील आवक स्थिर आहे. तरीही बाजारभाव स्थिर आहेत. तूर बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारातील वाढत्या आवकेसह लसणाच्या भावातही काही प्रमाणात नरमाई दिसून येत आहे. मागील काही आठवड्यांपासू लसणाचे भाव क्विंटलमागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत. किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे.

सध्या बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील, असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Seeds: देशी वाणांचे जतन करा, निसर्गाच्या सान्निध्यात राहा

Food Inspections: अन्न, खाद्यपदार्थ तपासणी मोहीम राबवा

Farming Tools: समस्याग्रस्त जमिनी सुधारण्यासाठी अवजारे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हप्त्यासाठी सरकारकडून २७७ कोटींचा निधी मंजूर; लवकरच खात्यात जमा होणार १५०० रुपये; शासन निर्णय जारी

Power Supply Disconnection: एक्क्यांशी हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा केला खंडित

SCROLL FOR NEXT