Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत हरभरा दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, लसूण आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

सोयाबीन बाजारातील मोठ्या पडझडीनंतर बाजार काहीसा स्थिरावून कालच्या तुलनेत आज काहीसा सुधारलेला दिसत आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा ९.५८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयातेलाचा बाजार ३९ सेंट प्रतिपाऊंवर बंद झाला होता. सोयापेंडचा भाव ३०९ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातील सोयाबीनचे भाव दबावातच असून आजही सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू भाव नरमले

कापसाचा बाजार निचांकी पातळीवर स्थिर आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही वायदे दबावातच आहेत. जागतिक बाजारात यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. सध्या मात्र कापसाला उठाव कमी आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. कापसाचे आयसीईवरील वायदे आज दुपारी जवळपास ६९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्याच्या भावात तेजी

हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे. पण मागणी कायम आहे. इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महीने आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.   

लसणाचे भाव नरमले

राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.   

कांदा दरात काहीशी सुधारणा

कांद्याच्या भावात आजही काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारात कांद्याची आवक मागील तीन दिवसांपासून काहीशी घटली आहे. तर शेतकऱ्यांकडील चाळीतील कांदा खूपच कमी आहे. त्यामुळे बाजारातही माल कमी येत आहे. परिणामी कांदा भाव पुन्हा काहीसे सुधारले आहेत. कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच कांद्याची आवक कमी होण्याचीही शक्यता व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT