Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस भाव दबावातच ; कापूस, सोयाबीन, हळद तसेच काय आहे आल्याचे दर ?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, केळी, हरभरा आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमधील चढ उतार कायम आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १२.३४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवर सोयाबीनचा भाव ४ हजार ७५० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता.

बाजार समित्यांमधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपये होती. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्ये एका पातळीदरम्यान चढ उतार होत आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे ७६.४७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील जुलैचे वायदे ५७ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर होते.

बाजार समित्यांमधील आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे. बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

किरकोळ बाजारात केळीला बऱ्यापैकी भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांची मात्र लूट होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील घाऊक बाजारात केळीला क्विलमागे ५०० ते ७०० रुपयांचाच भाव मिळत आहे.

प्रत्यक्षात शासनपातळीवर केळीचा भाव १२०० ते १४०० रुपये दिसत आहे. पण शेतकऱ्यांच्या हाती हा भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुढे चांगला उठाव असतानाही मागणी नसल्याचे कारण देत भाव पाडेल जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. 

सरकारने हरभरा आयात खुली केल्यानंतर भावात क्विंटलमागं ३०० रुपयांपर्यंत नरमाई आली होती. पण सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हरभऱ्याच्या भावात पुन्हा एकदा सुधारणा दिसून आली आहे.

हरभऱ्याचा भाव मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा ३०० रुपयांनी सुधारला. सध्या अनेक बाजारांमध्ये हरभरा ६ हजारांवर पोचला. तर सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. हरभऱ्याची ही भावापतळी आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्याससांनी व्यक्त केला. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे भाव गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहेत. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर ज्वारीच्या भावात आलेली नरमाई आजही कायम आहे.

ज्वारीची बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी झालेली दिसते. तरीही ज्वारीचे भाव ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. बाजारात ज्वारी व्हरायटी आणि गुणवत्तेनुसार भाव खात आहे. ज्वारी बाजारातील दराची ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon: मॉन्सूनने आगेकूच सुरूच; पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा

Cotton Fertilizer: जमिनीच्या प्रकारानुसार कपाशी पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे?

Farmer Group Competition: ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेत ७६८ शेतकरी गट सहभागी

Shaktipeeth Highway Protest: ''पैसा नको, शेती पाहिजे, मुलांना नोकऱ्या नाहीत, खायचं काय?''; शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, हजारो शेतकरी एकवटले

Agriculture Advisory: बीजप्रक्रिया करून पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी : कुलदीप देशमुख

SCROLL FOR NEXT