Cotton Market
Cotton Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Market : कापूस बाजारभाव पुन्हा वाढण्याचा अंदाज

Anil Jadhao 

कापसाचे भाव जसे रुईच्या दरावर अवलंबून असतात तसंच सरकीच्या दराचाही परिणाम होत असतो. कापसामध्ये फक्त ३५ टक्क्यांपर्यंत रुई असते.

तर ६५ टक्क्यांपर्यंत सरकी असते. त्यामुळं सरकीच्या दरासोबतही कापसाचे भाव (Cotton Rate) बदलत असतात.

मग सध्या सरकीचा भाव काय आहे? सरकी दराचा कापूस बाजाराला (Cotton Market) आधार मिळतो का? कापूस दर वाढतील का?पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. सोयाबीन दरातील चढ उतार सुरुच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील चढ उतार आजही कायम होते. आज बाजार सुरु झाल्यानंतर सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात नरमाई पाहायला मिळाली.

दुपारी एक वाजेपर्यंत सोयाबीन १५.१५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. मात्र दिवसभरात दरात मोठे चढ उतार होत आहेत. पण देशातील सोयाबीन दर टिकून आहेत.

आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होऊन भावपातळी ५ हजार ५०० रुपयांच्या पुढे जाईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

2. तुरीचा भाव तेजीत राहणार

देशात यंदा तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र उद्योगाची नजर बाजारातील तूर आवकेवर आहे.

त्यामुळं बाजारातील तुरीचे दर टिकून आहेत. सध्या बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

यंदा उत्पादन कमी राहण्याची शक्यता असल्यानं स्टाॅकीस्ट आणि प्रक्रिया उद्योग तुरीचा साठा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3. मोसंबीला कमी उठाव

मोसंबीचे दर सध्या कमी झालेले आहेत. सध्या बाजारात आलेल्या मोसंबीत गोडवा कमी असल्याचं व्यापारी सांगतात.

त्यामुळं थंडीच्या काळात या मोसंबीला कमी उठाव मिळतोय. सध्या मोसंबीला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपये दर मिळतोय.

उन्हाचा कडाका वाढल्यानंतर मोसंबीतील गोडवा वाढतो. त्यामुळं या काळात मोसंबीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज मोसंबी बाजारातील जाणकारांनी सांगितलं. 

4. लसणाची आवक घटली 

राज्यातील बाजारात सध्या लसणाची आवक कमी झाली. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता दैनंदीन आवक ३० क्विंटलपेक्षाही कमी होतेय.

त्यातच लसणाला थंडीमुळं चांगला उठावही मिळतोय. त्यामुळं लसणाला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळतोय.

लसणाला चांगली मागणी असल्यामुळे दर टिकून राहतील, तसेच पुढील काळात लसणाच्या दरात काहीशी वाढ होण्याचाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

5. कापसाचे भाव जसे रुईच्या दरावर अवलंबून असतात तसंच सरकीच्या दराचाही परिणाम होत असतो. कापसामध्ये फक्त ३५ टक्क्यांपर्यंत रुई असते.

तर ६५ टक्क्यांपर्यंत सरकी असते. त्यामुळं सरकीच्या दरासोबतही कापसाचे भाव बदलत असतात. तर सरकीचे भाव सरकीपासून तयार होणाऱ्या पेंड म्हणजेच ढेप आणि सरकी तेलाच्या दरावर अवलंबून असतात. सध्या सरकी ढेपेचे भाव टिकून आहेत.

सरकी ढेपेला २ हजार ८०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर आहेत. सध्या मका आणि सोयापेंडचे भाव काहीसे जास्त आहेत. त्यामुळं पशुखाद्य उद्योगातून सरकी पेंडेला मागणी वाढली. सरकी तेलाचेही दर सध्या तेजीत आहेत.

सरकी तेलाचा भाव ऑक्टोबर महिन्यात २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल होता. ते ३ हजार रुपयांच्या जवळपास आहेत.

सरकी पेंड आणि तेलाच्या दरामुळेही सरकीही तेजीत आहे. सध्या देशातील बाजारात सरकीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ४०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे.

सरकीचे भाव तेजीत असल्याने कापूस दर टिकून आहेत. सध्या देशातील बाजारात कापसाला सराकरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

नरमलेले भाव वाढण्यास सरकी दराचाही हातभार लागेल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT