Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापसाची आवक घटली ; पाहुयात कापूस रेट, सोयाबीन, टोमॅटो तसेच तूरीचे भाव ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : देशातील सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. आज बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तर बाजरातील आवक घटलेली दिसते. प्रक्रिया प्लांट्सचा भाव ४ हजार ७५० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार कायम आहेत. देशातील बाजारात पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये सोयाबीनमध्ये आणखी सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८६.६५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ६१ हजार ५६० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील आवक कमी झाली. कालची आवक ६० हजार गाठींवर होती. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस भावात सुधारणा अपेक्षित आहे. पण दरात चढ उतारही राहतील, अशा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीचे वाढलेले भाव कायम आहेत. मागणी वाढल्याने दरातही सुधारणा दिसून आली. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा १० हजारांच्या दरम्यान आला. तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार रुपये होता. बाजारातील आवक घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी  एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत. तर बाजारातील आवक वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासू लसणाचे भाव क्विंटलमागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत. किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे. सध्या बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील, असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT