Market Bulletin :
सोयाबीनमध्ये चढ उतार
जागतिक बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज काहीशी नरमाई आली होती. तरीही सोयाबीनचे वायदे १० डाॅलरपेक्षा वरच्या पातळीवर आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.३१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंड २९६ डाॅलर प्रतिटनांवर होते.
देशातील बाजारात मात्र चढ उतार सुरुच आहेत. आज प्रक्रिया प्लांट्सनी खेरदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. बाजार समित्यांमधील दरपातळी मात्र ३ हजार ९०० ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
मुगाचा बाजार दबावात
देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे.
देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजरीला चांगली मागणी
बाजरीला थंडीमुळे सध्या काहीशी चांगली मागणी आहे. तर बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे. यंदाच्या खरिपात बाजरीचे उत्पादन वाढल्याचे अंदाज आहेत. मात्र बाजारीला उठावही चांगला मिळत आहे. त्यामुळे बाजारीचे भाव मागील ३ आठवड्यांमध्ये अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारले.
आता बहुतांशी बाजारात बाजरीला २५०० रुपयांच्या पुढे दर मिळत आहे. तर सरासरी दरपातळी २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होती. रब्बीतील बाजारीची आवक सुरु होईपर्यंत बाजारीचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
केळीच्या भावात घसरण
नव्या केळीची राज्यात काढणी सुरु झाल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात केळीची काढणी सुरु झाली. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव दिसून येत आहे. दुसरीकडे थंडीमुळे केळीला उठावरही चांगला असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
असे असूनही आवकेमुळे दरावर दबाव दिसून आला. महत्वाच्या केळी बाजारांमध्ये सध्या १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान केळी विकली जात आहे. पुढील काही आठवडे बाजारातील केळी आवक कायम राहील, असा अंदाज आहे.
कापूस दबावातच
कापसाचा दबावातच आहे. कापसाच्या बाजारातील घडामोडीही थंडावल्यासारख्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाचे वायदे ६७.३८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही कापसाची आवक कायम आहे. त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.
देशातील बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव, या घटाकांचा दबाव आहे. जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरपातळीही स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.