Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : साखर तातडीने विकण्याचे कारखान्यांना आदेश

Anil Jadhao 

1. सोयाबीनच्या वायद्यांनी काल म्हणजेच गुरुवारी मागील दोन वर्षातील निचांकी टप्पा गाठला होता. सोयाबीनचे वायदे काल १२.९१ डाॅलरवर बंद झाले होते. तर आज सकाळपर्यंत वायदे १२.९८ डाॅलरवर पोचले. हा भाव डिसेंबर २०२१ नंतरचा सर्वात निचांकी आहे. देशात मात्र सोयाबीन भाव स्थिरावले आहेत. तसेच देशातील पिकाला दुष्काळाचाही फटका बसत आहे. त्यामुळे देशात सोयाबीनच्या भावावर आणखी दबाव येण्याची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

2.  कापसाच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी ८६.७६ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. तर देशातील वायदे ६० हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचे भाव ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान होते. यंदा जागतिक कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तर देशातही उत्पादन कमी होईल, याचा अंदाज आतापासूनच येत आहे. त्यामुळे कापसाच्या भावात वाढ होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

3. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव आज तिसऱ्या दिवशीही बंद होते. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद असले तरी राज्यातील इतर भागात लिलाव सुरु होते. पण नाशिक जिल्हा कांद्याचे आगार असल्याने इतर ठिकाणी आवक कमीच होते. विशेष म्हणजे कांद्याचे भाव दबावातच होते. कांद्याला सरासरी १ हजार ५०० ते २ हजारांचा भाव मिळाला. पण पुढील काळात कांद्याची आवक आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

4. टोमॅटोची भावपातळी अद्यापही दबावातच आहे. टोमॅटोची वाढलेली आवक आणि सरकारचा दबाव यामुळे टोमॅटोचे भाव दबावातच दिसतात. राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ४०० ते ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुरवठ्यापेक्षा कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तसेच टोमॅटोच्या दरावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असेही व्यापारी सांगत आहेत.

5. निवडणुकांच्या तोंडावर सरकार कोणत्याच शेतीमालाचे भाव वाढू न देण्याच्या मनस्थितीत आहे. सरकारने आधीच कांदा, टोमॅटो, खाद्यतेल, गहू, तांदूळ अशा शेतीमालाचे भाव कमी केले आहेत. आता साखरेकडे सरकारने मोर्चा वळवला. साखरेचे भाव मागील एका महिन्यात केवळ एक टक्क्याने वाढले. तरीही सरकारने साखरेची भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली. ऑक्टोरमध्ये दिवाळी मागणी वाढलेली असेल. त्यामुळे केंद्र सरकारने आताच ऑक्टोबरचा साखर विक्रीचा कोटा जाहीर करून कारखान्यांना ही साखर विकण्याचे आदेश दिले. सरकारने कारखान्यांना १३ लाख टन साखर विक्रीचा कोटा ऑक्टोबरसाठी दिला. ही साखर तत्काळ विकावी असा दमच केंद्र सरकारने कारखान्यांना दिला. साखरेचा घाऊक भाव सध्या ४ हजार ५४ रुपये आहे. तर किरकोळ बाजारात साखरेची विक्री जवळपास ४४ रुपयांनी होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेतही हा भाव तेवढा वाढलेला नाही. सरकार एवढ्यावरच थांबले नाही तर सरकारने देशातील सर्व साखर कारखाने, व्यापारी, घाऊक व्यापारी, मोठ्या विक्री चेनसह किरकोळ व्यापाऱ्यांनी आपल्याकडील साखरेच्या स्टाॅकची माहिती दर सोमवारी सरकारच्या पोर्टलवर भरण्याची सक्ती केली आहे. यावरून साखरेच्या बाबतीत सरकारच मनसुबा स्पष्ट दिसतो. पण जागितक पातळीवरील वाढलेले भाव, देशातील उत्पादनातील घटीची शक्यता यामुळे साखरेचे भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT