Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभरा चार महिने तेजीतच राहणार

Market Bulletin : सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढले आहेत. हरभरा भाव मागील दोन महिन्यांमध्येच क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत.

अनिल जाधव

1.  देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये मोठी तेजी आली होती. ऑगस्टच्या वायद्यांची आज मुदत संपणार आहे. दुपारपर्यंत ऑगस्ट वायद्यांमध्ये वाढ होऊन ६३ हजार ३६० रुपयांवर होते. तर इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंजवरील वायदे ८७.७८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. जागतिक कापूस उत्पादन यंदा घटणार आहे. त्यातच सणांमुळे कापसाला मागणी वाढत आहे. त्यामुळे कापूस भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे, असे जाणकारांनी सांगितले.

2. देशातील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसत आहे. सध्या सोयाबीन फुले आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पणी पावसाचा ताण बसत असल्याने उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या अनेक प्रक्रिया प्लांट्स मेंटनन्सवर गेले आहेत. त्यामुळं सोयाबीन बाजार स्थिर दिसतो. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. सोयाबीनचा भाव यापुढील काळात काहीसा सुधारू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला.
 

3. सणांमुळे डाळीला चांगली मागणी आहे. त्यामुळे तुरीच्या भावाला आधार मिळतोय. मध्यंतरी तुरीचे भाव स्थिरावले होते. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाचा पडत असलेला खंड आणि तुरीचा तुटवडा यामुळे तुरीच्या भावात दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढ दिसते. तुरीला सध्या १० हजार ते ११ हजारांचा भाव मिळत आहे. पुढील महिनाभरात आफ्रिकेची तूर आयात सुरु होईल. याचा बाजारावर काहीसा दबाव दिसू शकतो. पण तुरीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी दिला.

4. देशात सध्या केळीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच केळीला चांगली मागणी आहे. श्रावणातील मागणीमुळे दरातही चांगली सुधारणा झाली. सध्या राज्यातील बाजारात केळीला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. केळीची उपलब्धता कमी आणि मागणी जास्त असे समिकरण दिसत असल्याने केळीच्या भावाला आधार कायम राहू शकतो. पुढील काही दिवस केळीचे हे भाव टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढले आहेत. हरभरा भाव मागील दोन महिन्यांमध्येच क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. विशेष म्हणजे सरकारने यंदा देशात विक्रमी १३५ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज दिला होता. मागील हंगामातील स्टाॅकही २० ते २५ लाख टनांच्या दरम्यान होता. म्हणजेच देशात हरभऱ्याचा एकूण पुरवठा १५५ ते १६० लाख टनांच्या दरम्यान पोचला  होता. पण आता सरकारच्या या अकड्यांवर बाजारातून शंका उपस्थित होत आहेत. सरकारचे उत्पादनाचे अंदाज चुकले असे उघडपणे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हरभरा काढणीनंतर शेतकऱ्यांना जूनपर्यंत आपला हरभरा ४ हजार ८०० रुपयांपेक्षा कमी भावातच विकावा लागला होता. पण दोन महिन्यांतर हाच हरभरा आता ६ हजारांवर पोचला. त्यातच सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. सणांसाठी हरभऱ्याला मागणीही चांगलीच वाढली. त्यामुळे दराला चांगलाच आधार मिळाला. सरकार हरभरा भाव कमी करण्यासाठी उपाय करू शकते. पण आयातीवर मर्यादा आहे. ऑस्ट्रेलिया आणि टंझानियासह इतर हरभरा निर्यातदार देशांमध्येही सध्या जास्त प्रमाणात हरभरा उपलब्ध नाही. त्यामुळे बाजाराची भीस्त देशातील उपलब्ध मालावर जास्त असेल. परिणामी देशातील भाव जानेवारीपर्यंत तेजीतच राहू शकतात, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Millets : नवधान्यांची समृद्धी

Digital Agriculture : डिजिटल युगातील प्रगतीचा शेतकऱ्यांना फायदा

Cyclone Dana : ओडिशात 'डाना'ने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; १.७५ लाख एकरवरील पिकांचे नुकसान

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

SCROLL FOR NEXT