Cyclone Dana : ओडिशात 'डाना'ने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; १.७५ लाख एकरवरील पिकांचे नुकसान

Crop Damage Due to Cyclone Dana : बंगालच्या उपसागरात उसळलेल्या डाना चक्रीवादळाची तीव्रता सध्या कमी झाली आहे. पण या चक्रीवादळामुळे बंगालमध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर ओडिशातील १.७५ लाख एकर जमिनीवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage Due to Cyclone Dana
Crop Damage Due to Cyclone DanaAgrowon
Published on
Updated on

Pune News : डाना चक्रीवादळाची तीव्रता रविवारी (ता.२७) कमी झाली आहे. यादरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे ओडिशासह पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे विविध दुर्घटनेत पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान, दक्षिण परगणा, कोलकता आणि हावडा येथे एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ओडिशात एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ओडिशातील १.७५ लाख एकर जमिनीवरील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण विभागाने दिली आहे.

कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण विभागाचे प्रधान सचिव अरबिंदा पाधी यांनी शनिवारी (ता.२६) याबाबतची माहिती आपल्या एक्स अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी, चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे ओडिशातील १.७५ लाख एकर जमिनीवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच २.८० लाख एकर जमिनीवरील पिके बुडिताखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Crop Damage Due to Cyclone Dana
Cyclone Dana : डाना चक्रीवादळाचा कहर! ओडिशात मुसळधार पाऊस, झाडे पडली, रस्ते खचले; ओडिशात एक, बंगालमध्ये दोघांचा मृत्यू

यादरम्यान राज्य सरकारने कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तर अहवालाअंती सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी यांनी, वादळग्रस्त भागातून ८ लाख नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केल्याचेही सांगितले आहे.

डाना चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, छत्तीसगडला बसला असून सर्वाधिक बिहार आणि झारखंडमध्ये परिणाम दिसून आला. तर सर्वाधिक नुकसान ओडिशासह पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, चक्रीवादळामुळे सुमारे २२.४२ लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यातील १४.८ लाख घरांचा वीजपुरवठा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आला, तर उर्वरित घरांचा वीजपुरवठा शनिवारपर्यंत पूर्ववत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com