Ginger Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : अनेक वर्षांनंतर आले उत्पादकांना चांगला भाव

Ginger Rate : आल्याच्या दरात सध्या तेजी आली आहे. मागील काही वर्षे उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या आले पिकाने यंदा शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Team Agrowon

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये वाढ (Soybean Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातील सुधारणा कायम आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १४.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ४२६ डाॅलरवर होते. देशातही काही बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा दिसलीह होती.

पण सरसकट सर्वच बाजारांमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळं सरासरी दरपातळी ४ हजार ९०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा कायम राहील्यास देशातील बाजारांमध्ये दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापसाचा भाव दबावातच (Cotton Rate)

देशातील कापूस बाजार अद्यापही दबावातच आहेत. बाजारातील कापूस आवक एक लाख गाठींच्या दरम्यान होत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील आवक जास्त दिसते. परिणामी बाजारात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपये भाव मिळतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापसाच्या भावात सुधारणा कायम आहे. कापसाचे भाव ८४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणेचा देशातील बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) तुरीच्या दरातील तेजी कायम (Tur Rate)

सरकारच्या दबावानंतरही तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. बाजारातील आवकेबरोबर दरात काहीसे चढ उतार दिसत आहेत. मात्र सरासरी दरपातळी प्रत्येक आठवड्यात टिकून राहत आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे.

बाजारात तुरीचा गरजेप्रमाणे उठाव होतोय, तर गरजेऐवढीच तूर बाजारात विक्रीसाठी येत आहे, असे समिकरण जुळून आले. यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. पुढील काळातही तुरीचा पुरवठा मर्यादीत राहणार आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

४) हरभरा बाजार स्थिर (Chana Market)

बाजारात सध्या हरभरा भाव दबावातच आहेत. हरभऱ्याला सध्या ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाफेडची खेरदी आता अनेक ठिकाणी बंद पडली आहे. तसचं शेतकऱ्यांकडी हरभऱ्याचा स्टाॅकही कमी झाला.

त्यामुळे हरभरा दरात काही बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा दिसली. पण सरासरी दरपातळी कायम होती. सरकारकडील स्टाॅक आणि शेतकऱ्यांची विक्री पाहता काही दिवस हरभरा बाजार टिकून राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) आल्याचे दर तेजीत का आले? (Ginger Rate)

आल्याच्या दरात सध्या तेजी आली आहे. मागील काही वर्षे उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या आले पिकाने यंदा शेतकऱ्यांना दिलासा दिला. आल्याच्या भावाने अनेक बाजारांमध्ये १० वर्षांतील उच्चांकी भावाचा टप्पा गाठलेला दिसतो. कोरोनानंतर सलग तीन वर्षे आले पिकानं शेतकऱ्यांचं आर्थकारण बिघडवलं.

आले पिकाला उत्पादन खर्च जास्त लागतो. पण बाजारात त्यातुलनेत खूपच कमी भाव मिळत होता. परिणामी शेतकऱ्यांना पीक परवडेना. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आले पिकाकडे पाठ फिरवली. यंदा कमी लागवड, अवेळी पाऊस आणि कीड-रोगानं पिकाचं नुकसान होऊन उत्पादन घटलं.

परिणामी बाजारात आल्याचा पुरवठा कमी झाला. तर बाजारात मागणी वाढली आहे. लग्नसराईचाही फायदा आले बाजाराला मिळत आहे. त्यामुळे आल्याच्या भावात मोठी वाढ झाली. तसे आल्याचे भाव जानेवारीपासून वाढत आहेत.

पण सध्या अनेक हंगामातील उचांकी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. लागवडीलाही आल्याची मागणी वाढत आहे.

तसेच गुणवत्तापूर्ण आल्याला निर्यात आणि सुंठ निर्मितीसाठी मागणी आहे. त्यामुळे आल्याच्या दरातील तेजी चालू हंगामात टिकून राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT